मराठी शाळेतल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल…

शाळा शिकण्याची खरी मजा प्राथमिक शाळेत येते. आपल्या अनेक आठवणी प्राथमिक शाळेतल्या असतात. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तो विद्यार्थी देवी किंवा देव अंगात आलेल्या व्यक्तीचा अभिनय करू दाखवत होता.

अनेक पालकांचा कल इंग्लिश मिडीयमच्या शाळेकडे होता परंतु कालांतराने पुन्हा मराठी शाळेचे महत्त्व कळू लागले आहे. शाळा कोणतीही असो आत्मसात करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे हे महत्वाच. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे, ज्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतही प्रचंड टॅलेंट भरलेलं आहे हे दिसून येतं.

व्हिडिओमध्ये शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनासाठी नृत्य म्हणजेच इंग्रजी मिडीयमवाल्यांच्या भाषेत डान्स शिकवत आहेत. बर विशेष बाब म्हणजे हे गाणं अजिबात टिपिकल किवा जुनं नाहीये. डान्स मधील शिक्षिकेने अतिशय भन्नाट आणि हटके गाणं निवडलं आहे.

आपल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे की, जिल्हा परिषदेचे शिक्षक मंडळी असे निरनिराळे कार्यक्रम बसवत असतात. मुलांसोबतच शिक्षकांचंही कराव तेवढ कौतुक कमीच आहे. आपल्याला माहितच आहे १५ ऑगस्ट आणि २६जानेवारी व्यतिरिक्त शाळेत कार्यक्रम राबवले जातात.

अश्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना त्याचे यथायोग्य प्रशिक्षण देतात आणि विद्यार्थ्यांना ते शिकण्यात रसही निर्माण करतात. वेगवेगळी वेशभूषा करवून अनेक महापुरुषांबद्दल माहिती देतात त्यामुळे मुलानाही ते ऐकून आणि समजून घेण्यास सोप्पं जात.

आपल्या हाती लागलेल्या व्हिडीओतील शिक्षिका स्वतः एकदम मजा घेऊन डान्स करत आहेत. परिणामी विद्यार्थीही तितकीच मजा घेऊन डान्स करत आहेत. मुलांना ओरिजिनल डान्स टिव्हीत दाखवून तशीच डान्स स्टेप करण्याचा प्रयत्न करा असं काही शिक्षिका सांगताना दिसत नाहीत.

व्हिडिओमध्ये शिक्षिका स्वतः आधी नाचत आहेत आणि मुलं त्यांना फॉलो करत आहेत. विशेष बाब म्हणजे ही मुलं आदिवासी बहुल भागातील आहेत. हिंदी गीतांवर नाचणं हे त्यांच्यासाठी हिरो बनण्यासारखं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मूळ गाण्यात असणाऱ्या स्टेप्स आणि या शिक्षक- विद्यार्थीची जोडी करत असलेल्या स्टेप वेगवेगळ्या आहेत.

शिक्षिकेच्या या डान्स मागचं सत्य म्हणजे कलेला असणारं महत्त्व आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना दिलं जाणार प्रोत्साहन हे नेमकंपणाने सर्वांनाच कळलं पाहिजे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून शिक्षण देण गरजेच आहे.

हे ही वाचा-

नोराच्या जालिमा कोका कोला ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद! तीनच दिवसात पार केला तीन कोटी व्ह्युजचा टप्पा

मुली काही करु शकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लव्हलिनचे सडेतोड उत्तर; टोकियोत भारताला मिळवून दिले पदक

मनोज बाजपेयीचा अभिनय पाहून २ सिनियर अभिनेत्रींनी पडल्या होत्या त्याच्या पाया; नाव वाचून हैराण व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.