मनसे (MNS):राज्यात नवे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही राजकीय पक्षांची एकमेकांवरील कुरघोडी सतत सुरूच आहे. शिंदे गटात अजूनही आमदारांची इन्कमिंग सुरूच आहे. यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला.
यासोबतच आता मनसेलाही या सत्तांतराचा धक्का बसला आहे. आता महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे (मनसे) नेतेसुद्धा शिंदे गटात प्रवेश करत असल्याची चर्चा सुरू आहे. पनवेल, उरणमधील मनसेचे नेते शिंदे गटात सामील होत आहेत.
पनवेलमधील मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अतुल भगत शिंदे गटात सामील झाले. त्यांच्यासोबतच पनवेल, उरणमधील मनसेच्या एकूण १०० पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.
अतुल भगत यांनी मनसे मधील अंतर्गत धुसफूस हे कारण देत शिंदे गटात सामील होत असल्याचे सांगितले आहे. अतुल भगत यांच्यासह इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनसेच्या या नेत्यांचा शिंदे गटातील प्रवेश हा राज ठाकरेंना धक्का मानला जात आहे. अलीकडेच मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईसह रायगडचा दौरा केला होता. अमित ठाकरे दौरा करून जात नाही, तोच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
अंतर्गत राजकीय वाद आणि वारंवार होणारे खच्चीकरण यामुळे आम्ही बाहेर पडत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. याआधीही पनवेलमधील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. यात शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे, रायगड जिल्हा सचिव रुपेश पाटील, उपशहर प्रमुख मंगेश रानवडे, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख यांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
आम्ही अजूनही राजसाहेबांसोबत, आम्हाला फसवून शिंदे गटात नेलं होतं; मनसे नेत्यांनी सांगितली खरी कहाणी
आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन; कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट
सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वकीलांचा खणखणीत युक्तिवाद; शिंदे गटाचे टेन्शन वाढले
गणेशोत्सवात शेवटच्या ५ दिवसांत रात्री १२ पर्यंत साऊंड सिस्टीम वाजवता येणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा






