Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली व ४० आमदार आपल्या सोबत घेऊन गेले. त्यानंतर भाजपसोबत मिळून त्यांनी सत्ताही स्थापन केली. मात्र, एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या या ४० आमदारांपैकी ३७ जणांचा पराभव होणार असल्याचा अंदाज एका सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला होता.
हा अंदाज राष्ट्रीय पातळीवर निवडणूकपूर्व सर्व्हे करणाऱ्या एका कंपनीकडून वर्तवण्यात आला होता. जेष्ठ विचारवंत व प्रख्यात इतिहास अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी याबाबतचे एक ट्विटदेखील केले होते. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार निवडून येणार नाहीत असे या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते.
प्रा. हरी नरके यांनी या ट्विटमध्ये लिहिले की, “माझे एक निवडणूक सर्व्हे करणारे मित्र आहेत. त्यांचे अभ्यास ९५% पर्यंत अचूक असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झालेले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी शिंदे सेनेच्या ४० आमदारांच्या मतदारसंघात नमुना सर्व्हे केले असता ४० पैकी ३७ आमदार पराभूत होतील. म्हणजे मुख्यमंत्री शिंदेसाहेब राजकारण सोडणार तर,” असे त्यांनी या सर्व्हेत म्हटले होते.
यांनतर प्रा. हरी नरके यांनी सध्याच्या राजकीय परिस्थीवर भाष्य केले होते. यावेळी ते म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यकर्ता नाही, परंतु मी महिनाभर सतत यावर लिहीत आहे. तसेच मी उघड भूमिका घेतली असल्याने मला याची किंमत मोजावी लागेल असेही ते म्हणाले.
पुढे, राज्यातील जनता ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तसेच एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना लोक शिव्या घालत असून सर्वसामान्य लोक त्यांच्या बाजूने नाहीत, असेही त्यांनी सांगितले होते. तसेच कार्यकर्ते किंवा नेत्यांना ईडी, पैसे किंवा धाक दाखवून ते खिशात टाकत असतील, परंतु जनता उद्धव ठाकरेंसोबत आहे, असे हरी नरके यांनी सांगितले होते.
तसेच आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एक आमदार जरी पडला तरी राजकारण सोडून देण्याची घोषणा एकनाथ शिंदेनी केली आहे. मात्र, या सर्व्हेनुसार त्यांचे ३७ आमदार पडणार आहेत, असे नरके यांनी सांगितले होते. त्यांचे ट्विट प्रचंड व्हायरल झाले होते.
महत्वाच्या बातम्या
माणुसकी विकली..! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नाही; वृद्ध मुलाने केलं असं काही की, वाचून तुम्ही ढसाढसा रडालं
‘कुणाचीही युती व्होवो, ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही…,’ युवा सेनेने थोपटले दंड, दिले थेट आव्हान
गणेश विसर्जनाला अनेक ठिकाणी गालबोट; …अन् 4 भावंडं गेली वाहून, वाचा नेमकं काय घडलं?
शिवसेना.. शिवसेना.. शिवसेना..! बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच हवा; वाचा नेमकं असं घडलं काय?