Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!; शिंदे सरकारबरोबरच राज्यपालही येणार अडचणीत

Supreme Court : गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. खरी शिवसेना कोणाची?, शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? अशा अनेक मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात वाद सुरु होता. काल मंगळवारी राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

यावेळी सुप्रीम कोर्टाने पक्षचिन्हावरील वादाची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे. ठाकरे आणि शिंदे गटापैकी धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचे याबाबत निवडणूक आयोग ठरवेल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यासोबतच कोर्टात राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या बाबतीतही वाद सुरु होता.

यावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय देत शिंदे गटाबरोबरच राज्यपालांनाही धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यपालनियुक्त १२ आमदारांची नियुक्ती करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यपाल अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र, जवळपास दीड वर्ष राज्यपालांनी याबाबत कोणताच निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस हे नवे सरकार स्थापन झाले. त्यांनतर शिंदे सरकारकडून नव्या १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली. तसेच शिंदे सरकारने या १२ आमदारांच्या नियुक्तीची तयारीही सुरु केली होती. मात्र, आता याबाबत कोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

जुन्या आमदारांच्या नियुक्तीवर कोर्टात सुनावणी सुरु असल्याने राज्यपालांनी शिंदे सरकारच्या नव्या १२ आमदारांची नियुक्ती करण्याचे थांबवावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. कोर्टाच्या या आदेशामुळे राज्यपाल अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाच्या दिलाश्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी आधीपासून सांगत होतो की..
Eknath khadse : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर एकनाथ खडसेंच मोठं वक्तव्य, इंदिरा गांधींच्या काळातील पक्षफुटीचा दाखला देत म्हणाले
shinde group : ..त्यामुळे शिंदेगटाने दुसऱ्या पक्षात विलीण व्हावं किंवा नवीन पक्ष काढावा; सुप्रीम कोर्टात जोरदार घमासान