Supreme Court : गेल्या काही दिवसांपासून खरी शिवसेना कोणाची हा वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. अद्याप यासंबंधी कोणताच निर्णय झाला नाही. मात्र, आता लवकरात लवकर हा निर्णय व्हावा यासाठी शिंदे गटाने रिट याचिका दाखल केली आहे.
यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक आश्वासन दिले आहे. उद्या म्हणजेच बुधवारी यासंदर्भात घटनापीठाची स्थापना केली जाणार असल्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल काय लागतो, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उद्या खंडपीठाची स्थापना केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
आगामी काळात राज्यात विविध महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. तसेच मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे तिथे विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. याठिकाणी शिंदे गटानेही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे या निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या पक्षचिन्हाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शिंदे गट आता सुप्रीम कोर्टाकडे गेला आहे. त्यामुळे या प्रकरणावर लवकरच ५ न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे.
शिवसेना नाव आणि शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ कोणाचे याबाबत सुप्रीम कोर्टात वाद सुरु आहे. यासाठी ५ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. मात्र, अजूनपर्यंत याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी याचिका शिंदे गटाने न्यायालयात दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
BJP : शरद पवारांना रोखण्यासाठी भाजप आक्रमक, बारामतीत राबवणार अमेठी पॅटर्न; ‘हा’ आहे गेम प्लॅन?
Politics: ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात; खैरेंनी नवनीत राणांची लाजच काढली
कॉंग्रेसला भलं मोठं भगदाड! अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार?, कॉंग्रेसच्या गोटात खळबळ
गुजरात नशेचे केंद्र, मुंद्रा बंदरातून अंमली पदार्थांची तस्करी, पण मोदी..; राहूल गांधींचे गंभीर आरोप