Share

Supreme Court : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा’ ही शिंदे गटाची मागणी फेटाळत कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय; ठाकरेंना दिलासा

Supreme Court

Supreme Court : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. आता २७ सप्टेंबर रोजी या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता झालेल्या सुनावणीदरम्यान घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. यासाठी त्यांनी रिट याचिका दाखल केली होती. यावर त्यांना आज घटनापीठाची स्थापना केली जाणार असल्याचे आश्वासन न्यायालयाने दिले होते.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी आज घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनापीठामध्ये न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. नरसिंहा इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी घटनापीठाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला घेण्याचे स्पष्ट केले आहे.

न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली आजची सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी तर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवावे अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

पुढच्या सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी सूचना कोर्टाकडून देण्यात आली आहे. याआधी २३ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना दिली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर सुनावणी झाली. या प्रकरणाची शेवटची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर आता आजच्या सुनावणीमध्ये घटनापीठ स्थापन करून पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेली आहे.

महत्वाच्या बातम्या
Asia Cup : …तर पराभवानंतरही आशिया चषकाच्या फायनलमध्ये जाऊ शकतो भारतीय संघ; आहे ‘हा’ एकमेव मार्ग
Shivsena: दसरा मेळाव्यात ठाकरेंना मोठा धक्का! २ आमदार, १ खासदार, १५ नगरसेवकांसह अनेक बडे नेते शिंदे गटात प्रवेश करणार
Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकरांनी माफी मागीतली नाही तर त्यांना सडके मासे खाऊ घालू; कोळी महीला का संतापल्या? जाणून घ्या…
Navneet Rana : नवनीत राणांचा पोलिस स्टेशनमध्ये राडा, अधिकाऱ्यांवर बरसल्या, पोलिसांचेही जशास तसे प्रत्यूत्तर

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now