साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साऊथची अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यासागर फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होते. नुकताच त्यांना कोविडची देखील लागण झाली होती. अखेर आज सकाळी विद्यासागर(Vidyasagar) यांचे निधन झाले आहे.(The sudden death of the husband of the most expensive actress in the South)
यामुळे अभिनेत्री मीनाला मोठा धक्का बसला आहे. दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांनी विद्यासागर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साऊथ अभिनेता सरथकुमारने ट्विट करून विद्यासागर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच विद्यासागर यांच्या कुटूंबाला हे दुःख पचविण्याची शक्ती मिळो, असे देखील अभिनेता सरथकुमारने ट्विटमध्ये लिहिले आहे.
साऊथ अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांना काही वर्षांपूर्वी फुफ्फुसाचा आजाराचे निदान झाले होते. विद्यासागर गेल्या काही दिवसांपासून या आजारावर रुग्णालयात उपचार घेत होते. यामध्येच त्यांना कोविड देखील झाला होता. यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच ढासळत गेली आणि बुधवारी सकाळी विद्यासागर यांचे निधन झाले.
साऊथ अभिनेत्री मीना ही दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री मीनाने दक्षिणेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९० ते २००० या काळात अभिनेत्री मीना दक्षिणेतील सर्वात यशस्वी अभिनेत्री होती. अभिनेत्री मीनाने तामिळ, तेलुगू, मल्याळम अशा अनेक भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
https://twitter.com/realsarathkumar/status/1541838555500032001?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1541838555500032001%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Fsouth-actress-mina-husband-death%2F
चित्रपट क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर २००९ मध्ये अभिनेत्री मीनाने विद्यासागर यांच्यासोबत लग्न केले होते. विद्यासागर हे बंगळूरमधील मोठे व्यावसायिक होते. विद्यासागर आणि अभिनेत्री मीना यांना ११ वर्षांची एक मुलगी आहे. विद्यासागर आणि अभिनेत्री मीना यांच्या मुलीचे नाव नैनिका असे आहे. नैनिकाने देखील अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका केल्या आहेत.
साऊथ सुपरस्टार विजयची प्रमुख भूमिका असलेल्या ‘थेरी’ या चित्रपटात नैनिकाने महत्वाची भूमिका केली आहे. या चित्रपटात नैनिकाने अभिनेता विजयच्या मुलीची भूमिका केली आहे. विद्यासागर यांच्या निधनामुळे अभिनेत्री मीनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी विद्यासागर यांच्या निधनाबद्दल ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ दुर्मिळ आजारामुळे झाले पतीचे निधन
एकनाथ शिंदेंचा पाय खोलात! गाड्यांच्या किंमतीसह शेतजमीन लपवल्याचा आरोप, कोर्टात याचिका दाखल
दुधडी भरून वाहणाऱ्या गंगा नदीत ७० वर्षीय आजींनी घेतली उडी; पुढं जे घडलं ते पाहून थक्क व्हाल