शिवसेना (Shivsena): शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली आहे. तसेच राज्यातील अनेक आमदार, खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. यासोबतच आता ठाकरे गटातही अनेक नेत्यांची इन्कमिंग सुरु झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य मागास आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. लक्ष्मण हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा देणार आहेत. तसेच मातोश्रीवर येऊन ते आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
लक्ष्मण हाके यांना धनगर समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाते. आज दुपारी त्यांची विनायक राऊत यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर ते शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. बंडखोरीनंतर लक्ष्मण हाके यांचा शिवसेनेतील प्रवेश हा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे.
लक्ष्मण हाके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला. शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केलं. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजीबापू पाटलांना टफ फाईट देण्याची शक्यता आहे.
आंबेडकरवादी नेत्या सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर त्यांना उपनेतेपदही देण्यात आलं होतं. त्यामुळे दलित चेहऱ्यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्या रूपात शिवसेनेला एक आक्रमक ओबीसी चेहरा मिळाला आहे. तसेच त्यांच्या प्रवेशामुळे ओबीसी आरक्षण आणि शिवसेनेची भूमिका मांडणारा एक प्रभावी नेता शिवसेनेला मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Subodh Bhave: ‘जर माझं चुकलं असेल तर मी माफी मागतो’; ‘त्या’ वक्तव्यावरून अखेर सुबोध भावेचा माफीनामा
Shivsena: शिवसेना खेळणार मोठा डाव! ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य उतरणार राजकारणाच्या मैदानात
MNS: शिंदेगटाचे लक्ष्य आता मनसेवर! तब्बल १०० पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत पाडले मनसेला खिंडार
Mumbai: बिल्डींगमध्ये राहणारी ती महीला शेजाऱ्यांना पाठवायची पाॅर्न व्हिडीओ; सत्य समजल्यावर सगळेच हादरले