पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या हत्ती महालाची गोष्ट एकदा वाचायलाच हवी

 

आपल्या आजूबाजूला अनेक आश्चर्यकारक अशा गोष्टी घडत असतात. जगातली वेगवेगळी आश्चर्य सोडली तर, आपल्याला मन भारावून टाकणारी अनेक आश्चर्य आपल्याला दिसू लागतात.

आज आपण अशीच एक डोळे दिपून टाकणारी आश्चर्यकारक गोष्टीचा इतिहास पाहणार आहोत. ही गोष्ट आहे प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हत्ती महालाची.

भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यात असलेला मांडू शहरात हा हत्ती महाल आहे. विशाल हत्ती सारखा दिसणारा हा महाल एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मांडू गावातील हत्ती महालाला आजून एक नाव आहे ते म्हणजे मांडवगड.

इंडो-इस्लामिक स्थापत्य शैलीमध्ये बनवलेला हा महाल समुद्रसपाटीपासून ६०० मिटर उंचीवर आहे. या महालाला तारांग साम्राज्यातील राजांनी बनवले होते. मात्र या महालात तारंग साम्राज्यातील राजे जास्त काळ राज्य करू शकले नाही.

पुढे १८ व्या शतकापर्यंत हा महाल पर्यटकांसाठी विशेष आकर्षण बनला होता. मात्र या जागेतील दरिया खान यांच्या समाधीमुळे या जागेला मोठे महत्व प्राप्त झाले. आणि पुढे या जागेला समाधी स्थळामध्ये बदलण्यात आले.

आजही या महालाच्या आतील आणि बाहेरील जागेवरती अनेक समाधी आपल्याला दिसून येतात. तसेच इस्लामी शैलीमध्ये बनवलेल्या मस्जिदती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.

या महालाची विशेषतः म्हणजे, भव्य दगडांनी या महालाची संरचना केली गेली आहे. या महालचा सर्वांत सुंदर असा भाग आहे तो म्हणजे हत्ती महालातील गाभारा. महालाच्या आतमध्ये जे विशाल खंबे आहेत त्यांमुळे महालाचा गाभारा अतिशय सुंदर असा दिसतो.

तसेच या हत्ती महालाचे अनेक विशाल असे स्तंभ असल्यामुळेच या महालाचे नाव हत्ती महाल असे ठेवण्यात आले होते. सोबतच या महालापासून १०० किमीच्या अंतरावर काही प्राचीन इमारती आहेत ज्यांना ‘रॉक सिटी” नावाने ओळखले जाते.

या हत्ती महालाला आता विरासत स्थळ म्हणून ही ओळखले जाते. हा महाल इस्लामिक वास्तुकलेच्या असाधारण स्थळांपैकी एक आहे.

-निवास उद्धव गायकवाड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.