लेखक दिग्दर्शक प्रविण तरडेंनी आनंद दिघेंचा बायोपिक केला आहे. बायोपिक करताना त्यांनी त्याच्यावर डॉक्युमेंट्री होऊ न द्यायची पुरेपूर काळजी देखील घेतली आहे. प्रथम मिळालेल्या टायटल रोलचं प्रसाद ओकनं सोनं केलं आहे. प्रसाद ओककडे ९५ चित्रपटांची शिदोरी देखील आहे.
कोण आनंद दिघे? हा प्रश्न जर कोणाला पडत असेल किंवा ठाण्याचा वाघ कोण? या प्रश्नांची उत्तरं जर कोणाला माहिती नसेल तर त्याचं उत्तर ‘धर्मवीर’ आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्याचं आयुष्य प्रेक्षकांसमोर मांडलं आहे.
चित्रपटाची सुरूवात ही महिला पत्रकार तट्टम आणि रिक्षावाला समीर यांच्या माध्यमातून होते. तट्टम बॉलिवूडची पार्टी सोडून आनंद दिघेंची पुण्यतिथी कव्हर करायला जाते. यामुळे तट्टम नाराज असते. तट्टमला दिघेंबद्दल काहीच माहिती नाही. दिघेंच्या समाधीजवळ पोहचल्यावर तट्टमला तेथील गर्दी पाहून ती गर्दी पैसे देऊन जमवल्याचं तिला वाटलं होत.
समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहन्यासाठी जमलेल्या लोकांची एकच स्टोरी होती. समाज्यामध्ये दिघेंनबद्दल प्रत्येकांच्या मनात वेगळं स्थान होतं. समाज्यामध्ये काहींच्या आठवणींच्या माध्यमातून पडद्यावर पहायला मिळतात. तर काही दृश्यामध्ये ते भावुक करतात, व्यवस्थेविरूध्द मनात चिड निर्माण करतात.
दगंलीच्यावेळी दिघेंनी घेतलेली भूमीका, पोलिसांच्या डोळ्यात धूळ चाळून केलेले हिंदू भगिनिंचे रक्षण, हिंदू-मुस्लिम दंगलसाठी घेतलेला पुढाकार, शेतकऱ्याचे पैसे खाणाऱ्या डान्स बारवर केलेली कारवाई, दिघेंनी चालवलेली समांतर न्यायालये, रक्षाबंधन, नवरात्री, गुरूपोर्णिमा आणि ठाण्यातील राजकारणावर उमटवलेली मोहोर अशा विविध माध्यमातून आनंद दिघे यांचा जिवनप्रवास समोर येत आहे.
प्रसाद ओकशिवाय आनंद दिघेंच्या व्यक्तिरेखेला कोणताही अभिनेता न्याय देऊ शकला नसता. प्रसादने दिघे खरे वाटावेत असे सादर केले आहेत. संवाद फेक आणि बारिकसारीक गोष्टींवर प्रसादने काम केलं आहे. रिक्षावाला गश्मीर महाजन आणि पत्रकार श्रुती मराठेनं भूमीका चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत.
महत्वांच्या बातम्या:-
अजय देवगणच्या प्रेमात वेडी झाली कंगना; ब्रेकअप झाल्यावर म्हणाली, विवाहित पुरुषासोबत राहून चूक केली…
“पवार साहेब पाकिस्तानात तुमचं स्वागत केलं कारण त्यांना त्यांची माणसं बरोबर कळतात”
उमरानचे वडिल म्हणाले, माझा मुलगा भारतासाठी खेळणार; शमी म्हणाला, त्याच्याकडे वेग आहे पण…