राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्धार

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील कोरोना स्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली.

महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना काही अन्य आजारांचे त्रास सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे कोरोना नंतरच्या उपाचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वांचं कौतुकच होत आहे. मात्र अजून लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही आणि यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.