अजितदादा संतापले; आवाहन करुनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसेल तर कठोर निर्णय घ्यावा लागेल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जनतेला आवाहन करुनही प्रतिसाद मिळत नसेल तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल,’ असे वक्तव्य पवार यांनी केले.

‘आपापली जबाबदारी लक्षात घेवून नियमांचे उल्लंघन न करता होळी साजरी करा. सध्याची परिस्थिती पाहता शांतपणे होळी साजरी करा. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे. प्रत्येकानं नियमांचे पालन केलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

वाचा काय आहेत नव्या गाईडलाईन

. आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

. आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील. या ठिकाणी कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

. मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

. आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचं बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. घालून दिलेल्या नियमांचं हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना कोणतीही परवानगी राहणार नाही. नाट्यगृहे आणि हॉल अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरता येणार नाहीत. अशा प्रकारे कुणी कार्यक्रम केल्यास कारवाई करमअयात आली. तसेच संबंधित नाट्यगृह किंवा हॉलची मालमत्ता कोरोना काळ संपेपर्यंत बंद ठेवण्यात येील.

. लग्नकार्यात ५० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.

. अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी राहील. त्यापेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कारवाई करण्यात येईल.

. धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच शक्यतो ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात यावी. तसेच मंदिरात येणाऱ्यांनी कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळली की नाही ते पाहूनच त्यांना मंदिरात प्रवेश देणे.

. काही बंधनांसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल. मात्र त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या 

तापसी पन्नूने दिले एका वयोवृद्ध महिलेला जीवदान, वाचून तुम्हीही कराल कौतुक

हिंदुंच्या सणांना ठाकरे सरकाचा विरोध का? सरकारच्या नव्या नियमांविरोधात भाजप आक्रमक

अधिकाऱ्याच्या बचावासाठी निवेदन घेऊन आलेल्यांवर नवनीत राणा भडकल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.