Farmer : सध्या राज्यातील शेतकरी हा अनेक समस्यांशी झुंजत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अनेकांकडून मागणी केली जात आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याने जर काही पिकवले नाही तर संपूर्ण जगात खाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, जंगली जनावरे अशा अनेक समस्यांना शेतकऱ्याला कायम तोंड द्यावे लागत असते. या सर्व नैसर्गिक समस्या शेतकऱ्याच्या हातात नसतात.
परंतु, जर शासनाने वेळोवेळी शेतकऱ्याला मदत केली तर तो नक्कीच या समस्यांना सामोरे जावू शकतो. असाच एक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन राज्य सरकारने आपल्या बळीराजाला दिलासा दिला आहे. राज्य अन्न आयोगाने महावितरण आयोगाला शेतकऱ्यांची वीज न कापण्याची सूचना दिली आहे.
महावितरण आयोगाकडून विजबिलाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता राज्य अन्न आयोगाने याविषयी मोठा निर्णय दिला आहे.
राज्य अन्न आयोगाने यापुढे शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश महावितरण आयोगाला दिला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अन्न कायद्यानुसार दाखल याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या विरोधात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सचिन धांडे यांनी राज्य अन्न आयोगात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता अन्न आयोगाने हा निर्णय दिला आहे. सचिन धांडे यांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे.
याविषयी बोलताना सचिन धांडे म्हणाले की, शेतातील वीज कनेक्शन कापलं तर शेतकऱ्यांचं उभं पीक नष्ट होतं. त्यांनतर त्या शेतातून कुठलंही उत्पन्न मिळत नाही. तिथलं अन्न नष्ट होतं आणि जी राष्ट्रीय संपत्ती आहे ती नष्ट होते. त्यामुळे पीक निघेपर्यंत वीज कनेक्शन कापू नये.
राज्य अन्न आयोगाने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत असा निकाल दिलेला आहे की, शेतात पीक उभं असेपर्यंत वीज कंपन्यांनी कोणाचंही विद्युत कनेक्शन कापू नये. कुठल्याही मार्गाने वीज पुरवठा बंद करू नये. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि लोकप्रतनिधींना विनंती करतो की, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
Trupti Desai : पुण्याचे राजकारणी इतके निर्लज्ज कसे झाले? विनायक निम्हणांच्या निधनाला २४ तासही झाले नाही तोच…
Eknath Shinde : राज्यातील प्रकल्प गुजरातला का जाताय? मुख्यमंत्री शिंदेंनी सोडलं मौन, म्हणाले…
Pune : पुणे तिथे काय उणे! तरुणाने पोलिसांचीच काढली चुक, दोन हजारांचे कापलेले चलन केले रद्द