भंडारा जिल्हा रूग्णालयात शिशू केअरला शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागुन १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी होती. या घटनेने राज्यासह संपूर्ण देश हळहळला होता. या घटनेनंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तात्काळ या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. या घटनेनंतर गावा गावात चुली सुध्दा पेटल्या नव्हत्या. राज्यातील मंत्री या घटनेची पाहणी करण्यासाठी आले त्यांनी शासकीय विश्रामगृहात आराम केला जेवणही केले पण कूणीही या परिस्थितीत मांसाहार केला नाही.
कोणताही मंत्री जिल्हा दौऱ्यावर आल्यावर मंत्र्यासोबत असलेले अधिकारी, कर्मचारी यांची बडदास्त ठेवली जाते. पण घटना कोणती घडली आहे परिस्थिती काय आहे. याच भान नसलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क विश्रामगृहात चिकन मटनावर मनसोक्त ताव मारला.
सरकारी विश्रामगृहावर काही कर्मचारी चिकन मटनावर ताव मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. मृत बालकांच्या कूटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आपण आलो आहोत याचंही भान या कर्मचाऱ्यांना राहिलं नव्हतं.
अशा दु:खद प्रसंगी चिकन मटन खाण्याची इच्छा कशी होते. अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
महत्तवाच्या बातम्या-
…तोपर्यंत कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होत राहणार; WHO तज्ज्ञांनी दिला इशारा
बाॅलीवूडचा सर्वात यशस्वी खलनायक महेश आनंदचा मृतदेह दोन दिवस सडत पडला होता..
पोस्टाच्या ‘या’ जबरदस्त योजनेत 100 रुपये गुंतवा आणि व्हा लखपती; जाणून घ्या सविस्तर..
एका अभिनेत्रीसाठी सनी देओलने केली होती अक्षय कुमारची धुलाई