सहाव्या पत्नीने सोबत झोपण्यास नकार दिला; पठ्ठ्याने सातवी पत्नी आणली

आपल्या आयुष्यातील सर्वात महत्तवाची गोष्ट म्हणजे लग्न. प्रत्येकाल लग्न करण्यास उत्सूकता असते. काही जण लवकर लग्न करतात तर काही जण स्वत:च्या पायावर उभं राहिलं की लग्न करतात. एका मुलीशी लग्न करून तिच्यासोबत संसार करण्याची स्वप्न आपन रंगवत असतो पण गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील कपलेठा या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पत्नीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्याने पतीने त्या गोष्टीसाठी दुसरी बायको आणली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीचे वय ६३ वर्ष आहे आणि त्याची पहिली ६ लग्न झाली होती. असे असूनही तो सातव्या पत्नीला घरी घेऊन आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कपलेठा गावात अयूब डिगिया हा ६३ वर्षीय व्यक्ती राहतो. त्याला मधूमेह आणि अन्य काही आजार आहेत. त्यामुळे त्याला रात्री झोप लागत नाही. सहाव्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला. अयूबला तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते पण तिने त्याला नाही म्हटले.

कामासाठी काही दिवस बाहेर जात असल्याचं कारण सांगत अयूबने तिला सासरी नेऊन सोडले. त्यानंतर तो तिला परत आणण्यास कधी गेलाच नाही. त्याने सातवे लग्न केले. तिच्या पतीने सातवे लग्न केल्याचं समजताच सहाव्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लागलीच पतीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत तिने म्हटले आहे की, सप्टेंबर २०२० मध्ये मी अयूबशी लग्न केले होते. कोरोनामुळे मी शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला होते. त्यामुळे मी त्याच्यासोबत झोपत नव्हते. मला संबंध ठेवण्यासाठी पत्नीची गरज असल्याचं कारण देत त्याने सातवे लग्न केले असल्याचं सहाव्या पत्नीचं म्हणणं आहे.

लग्न झाल्यानंतर सहाव्या पत्नीला गावकऱ्यांनी सांगितले की आतापर्यंत आयूबचे पाच लग्न झालेली आहेत. तो महिलांना फसवून लग्न करून घेऊन येत असे. काही काळ त्यांच्यासोबत राहून तो सोडून देऊन पून्हा नवीन लग्न करतो. याबाबत त्याच्या ६ व्या ४२ वर्षीय पत्नीने फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

महत्तवाच्या बातम्या-
दिग्दर्शकाच्या ‘त्या’ घाणेरड्या मागणीला कंटाळून मल्लिका शेरावतने सोडली होती फिल्म इंडस्ट्री
“अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का?”; कंगणा रणौत
इशा केसकरच्या बिकनीतील फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; पहा फोटो
सैफच्या बेडरुममधील ‘या’ वाईट सवयीला वैतागली आहे; करिना म्हणाली, मी झोपलेली असतानाही तो मला… 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.