Share

Eknath Shinde : शिंदे सरकार अडचणीत सापडणार? माहिती अधिकारामार्फत धक्कादायक माहिती आली समोर

Eknath Shinde Devendra Fadanvis

Eknath Shinde : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची याबाबत वाद सुरु आहे. हाच सत्तासंघर्षाचा वाद आता सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला आहे. यातच आता शिंदे – फडणवीस या नव्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यपाल सचिवालयाकडे दोन्ही पक्षांनी सरकार स्थापनेसाठी एकमेकांना पाठिंबा देण्याबाबतच्या ठरावाची कागदपत्रे नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारामार्फत ही माहिती मागवली होती. त्यात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी राज्यपाल भवनाकडे शिंदे सरकारच्या पाठिंब्याबाबतची माहिती मागितली होती. यावर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी सदर माहिती आमच्या कार्यालयात उपलब्धच नसल्याचे उत्तर दिले आहे. ही माहिती संतोष जाधव यांनी माहिती अधिकारामार्फत मागवली होती.

त्यामुळे जर दोन्ही पक्षांनी एकमेकांना पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रेच दिलेली नाहीत. तर मग राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले होते?, असा प्रश्न संतोष जाधव यांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदेनी शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. परंतु राज्यपालांच्या सचिवालयाकडे सत्ता स्थापन करण्यासाठीच्या पाठिंब्याची कागदपत्रेच उपलब्ध नसल्यास शिंदे-फडणवीस सरकार वैध की अवैध? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिवसेंदिवस राज्यातील सत्तासमीकरणाला नवनवे वळण येत आहे. राज्याच्या राजकारणात दररोज काहीतरी वेगळे घडत आहे. त्यामुळे आता समोर आलेल्या या प्रकरणावर महाविकास आघाडी कोणती भूमिका घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या टीका
Shivsena : शिवसेना-संभाजी ब्रिगेडची झाली युती, राज्याच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार?
Shivsena : मोदी सरकारकडे बहुमत असूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घाबरते, शिवसेनेची जहरी टीका
Thriller: ‘हे’ 6 चित्रपट तुमच्या अंगावर आणणार काटा, पुढील महिने असतील मिस्ट्री, सस्पेन्स अन् थ्रिलरने भरलेले
Akshay Kumar: चित्रपट फ्लॉप होताना पाहून अक्षयने घेतला मोठा निर्णय, बाकीच्या कलाकारांचे वाढवले टेंशन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now