पोत्यांची थापी रचल्यासारखे २२ मृतदेह एकाच रुग्णवाहीकेत कोंबले; बीडमधील हादरवून टाकणारी घटना

बीड | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भीषण रुप धारण केले आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांना जीव गमवावे लागत आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील वातावरण चिंताजनक झाले आहे.

दिवसेंदिवस मृत्यूंची संख्या वाढत असल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लांबच्या लांब रांगा लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना बराच वेळ थांबाव लागत आहे. काही ठिकाणी तर एकाच सरणावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचं चित्र दिसत आहे.

बीडमध्ये अशीच एक संतापनक घटना घडली आहे. अंबाजोगाई तालूक्यातील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे २२ रुग्ण मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेत तब्बल २२ मृत रुग्णांना कोंबून नेण्यात आलं आहे.

रामानंद तिर्थ रुग्णालयाकडे सध्या दोनच रुग्णवाहिका आहेत. रुग्णवाहिकांची मागणी करूनही हॉस्पीटल प्रशासनाला रुग्णवाहिका देण्यात नाहीत. त्यामूळे  नाईलाजास्तव एकावर एक पोत्यांसारखी थापी करत मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले.

रुग्णांना लस, औषध, बेड, ऑक्सिजन याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. जीवंतपणीच रुग्णांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत. त्यातच रुग्णांच्या मृत्यूनंतरही मृतदेहांची हेळसांड होत असल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार,  देशात आजवर कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ वर जाऊन पोहोचली आहे. तर  १ लाख ९७ हजार ८९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोण आहेत प्यारे खान? ज्यांनी गरीब रूग्णांना ऑक्सिजन मिळावा म्हणून ८५ लाख खर्च केले
धक्कादायक! अभिनेत्रीनेच केली सख्य्या भावाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले
ऑक्सिजन मिळत नाही अशी तक्रार करणाऱ्यांची संपत्ती जप्त करा; योगींचे भयानक आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.