प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञाचा धक्कादायक दावा; कोरोना तर काहीच नाही अजून…

कोरोनाने गेल्या सहा महिन्यांपासून जगात हाहाकार माजवला आहे. चीनमधून पसरलेल्या या कोरोना व्हायरसने सगळ्यांना इच्छा नसताना घरात बसायला लावले आहे. जगभरातील सर्वात जास्त रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील एका मोठ्या संशोधकाने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.

अमेरिकेतील भाषावाद आणि राजनैतिक विश्लेषक नॉम चॉम्स्की यांनी दावा केला आहे की कोरोनाची महामारी किरकोळ आहे. याच्यापेक्षा भयानक दोन संकटे अजून यायची बाकी आहेत. डीआययएम-२५ या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते बोलत होते.

९१ वर्षीय विश्लेषक नॉम चॉम्स्की यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस हा ट्रम्प सरकारच्या काळात आला आहे. आणि दिवसेंदिवस जास्त धोकादायक ठरत आहे. कोरोना व्हायरसचे भयंकर परिणाम जगभरात दिसून येत आहेत.

पण आपण सगळेचजण यामधून बाहेर येऊ शकतो. पण इतर दोन संकटापासून वाचणं कठीण आहे. यामुळे सर्वच उधवस्त होऊ शकतं. अमेरिकेची वाढत जाणारी क्षमता विनाशाचं कारण ठरू शकते.

डाऊन तो अर्थ या पत्रात ही मुलाखत देण्यात आली आहे. क्युबा युरोपची मदत करत आहे पण जर्मनी ग्रीसची मदत करण्यासाठी तयार नाही. कोरोना व्हायरस आपल्याला कशाप्रकारचं जग हवं आहे असा विचार करण्यास भाग पाडत आहे.

सार्स महामारी स्वरूप बदलून कोरोना व्हायरसच्या रूपात समोर येऊ शकते. याची कल्पना आधीपासूनच होती. श्रीमंत देश कोरोना व्हायरसच्या लसींवर काम करू शकले असते परंतु त्यांनी असं काहीही केलं नाही. सगळी मनमानी केली आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये अमेरिकेने कोरोनाबाबत शंका व्यक्त केली होती पण त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. ३१ डिसेंबरला चीनने WHO ला निमोनिया बाबत सूचित केले आणि एक आठवड्याने त्यांनी कोरोनाचे रूप ओळखले. त्यानंतर संपूर्ण जगाला याबाबत कल्पना देण्यात आली. आज २ कोटींपेक्षा जास्त लोक क्वारंटाईन आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.