Shinde Group : “शिंदे गटाला RSS च्या बाळासाहेब देवरसांचे नाव मिळाले, भाजपने डाव साधला”

Shinde Group : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात खरी शिवसेना कोणाची याबद्दल वाद सुरु आहे. याबाबत अद्याप कोणताच निर्णय लागला नाही. मात्र, आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने शिवसेना कोणत्या नावाने आणि कोणत्या चिन्हावर ही निवडणूक लढवणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी नावांचे आणि चिन्हाचे पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवले होते. दरम्यान, दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने नवीन नाव आणि चिन्ह दिले आहे.

यावेळी ठाकरे गटाला “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” असे नाव देण्यात आले आहे, तर शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नाव देण्यात आले आहे. मात्र, आता शिंदे गटाच्या नव्या नावावरुन वाद निर्माण झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना या नावावरून राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

या नावासंदर्भात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. शिंदे गटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस यांचे नाव मिळाले, भाजपने डाव साधला, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावावरून आता चर्चांना उधाण आले आहे.

तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले होते. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार,” असे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले होते. त्यांच्या या ट्विटवर अनेक खिल्ली उडवणाऱ्या कमेंट्स येत आहेत.

दुसरीकडे, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
Dipak Kesarkar : दिपक केसरकर बाजारबुणगे, हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही, मंत्रीपदाचे गाजर दिसताच…
Uddhav thackeray : ‘देशपातळीवर भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करा’; प्रमुख विरोधी नेत्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
Dipak Kesarkar : शिंदेगटाच्या नेत्याकडून पवारांचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘ते तर भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह…
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं ‘मशाल’ चिन्हांसोबतचं ‘हे’ भावनिक पत्रक होतयं व्हायरल; काय आहे नेमकं प्रकरण वाचा