Robbery : राज्यात सध्या चोरी व लुटमारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या भागातून चोरीची बातमी समोर येत असते. अशातच मुंबई येथे एक चोरीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे घरातील नोकरानेच ही चोरी केली आहे.
शिखा असे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर विजय असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार शिखा व त्यांचे पती कांदिवली येथे लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील विस्प्रिंग पाम इमारतीत राहतात. विजय नावाचा व्यक्ती त्यांच्या घरी नोकर म्हणून काम करायचा.
शिखा यांनी त्यांच्या घरातील बेडरूममधील बेडला डिजिटल तिजोरी लावली होती. या तिजोरीत त्यांनी सोने, हिरे आणि मोत्यांचे दागिने ठेवले होते. ही गोष्ट त्यांच्या नोकराला माहिती होती. त्याने याच गोष्टीचा फायदा घेतला आहे.
शिखा आणि त्यांचे पती ६ सप्टेंबर २०२२ रोजी कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे विजयला कळले. विजयने हीच संधी साधली. विजयला डिजिटल लॉकरचा नंबर माहीत होता. त्यामुळे त्याने स्क्रू ड्रॉयव्हर आणि गॅस कटरचा आधार घेत बेडला असेलली दागिन्यांची तिजोरी बेडपासून वेगळी केली.
त्यानंतर ती तिजोरी घेऊन तो पळून गेला. शिखा आणि तिच्या पतीला हे कळताच त्यांनी समता नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यांनतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली. त्यांनी शिखा राहत असलेल्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
यात विजयची चोरी पकडली गेली. चोरीचे सामान घेऊन जात असताना विजय या कॅमेरात स्पष्ट दिसत होता. त्यांनतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. बिहारमधील फोर्ब्सगंज, अरेबिया या ठिकाणाहून पोलिसांनी विजयला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून दुचाकी आणि दागिने जप्त केले आहे. चोरलेल्या दागिन्यांमधील काही सोने आरोपीने पाटण्यातील सोनाराला विकून त्या पैशातून दुचाकी घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
मंदिरात गेले प्रसाद संपला आणि बाहेर आल्यानंतर चप्पल चोरीला गेली अशी अवस्था एकनाथ खडसेंची
सोनम कपूरच्या घरी करोडोंची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक; चोरीचे कारण ऐकून धक्का बसेल
या सरकारी अधिकाऱ्यामुळे पुर्ण जगात खराब झाली बिहारची प्रतिमा, ६० फुटांचा पुलच केला चोरी