Crime : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात सध्या सिरीयल किलरची दहशत सुरु आहे. एका सिरीयल किलरने जिल्ह्यात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे तो केवळ सुरक्षा रक्षकांवर निशाणा साधत आहे. आतापर्यंत त्याने चार सुरक्षारक्षकांची हत्या केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एक सिरीयल किलर सुरक्षा रक्षकांची हत्या करत आहे. सुरक्षा रक्षक झोपले असतानाच तो त्यांच्यावर हल्ला करतो. त्याने गेल्या ७२ तासांमध्ये ३ सुरक्षा रक्षकांना संपवले आहे. यातील तिसऱ्या मृताच्या मृतदेहाजवळ दुसऱ्या मृताचा मोबाईल सापडल्याचे सांगण्यात आले आहे.
तो सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर हल्ला करतो. यासाठी तो दगड, काठी, हातोडा अशा कुठल्याही वस्तूचा वापर करतो. या तीनही हत्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या आहेत. या सर्व खुनाच्या पद्धतीत साम्य असल्यामुळे त्यामागे सिरियल किलर असण्याची शक्यता आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रम सिंह कुशवाह यांनी सांगितले की, कॅन्ट पोलिस स्टेशन परिसरात २८-२९ ऑगस्टच्या मध्यरात्री एका कारखान्यातील चौकीदाराची डोक्यावर हातोड्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कला व वाणिज्य महाविद्यालयात ड्युटीवर असलेल्या आणखी एका सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला.
पुढे त्यांनी सांगितले की, तिसरी घटना ही मोती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३०-३१ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. आरोपीने एका घराचा सुरक्षारक्षक असलेला मंगल अहिरवार याच्या डोक्यावर वार करून खून केला. कुशवाह म्हणाले की, या सर्व घडामोडींचा कालावधी आणि पद्धतीत साम्य आहे.
त्यामुळे यात एकाच व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. परंतु आरोपी एकापेक्षा जास्त किंवा वेगवेगळेसुद्धा असू शकतात. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या सर्व घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
Shivsena : संभाजी ब्रिगेड पाठोपाठ आणखी एका संघटनेचा शिवसेनेला पाठींबा; शिंदे फडणवीसांच्या पोटात गोळा
Tata Motors : येत आहे टाटाची नवीन Blackbird SUV, क्रेटा आणि नेक्सॉनचेही उडवणार होश
Melghat: मी मुक्काम केलेलं घर रात्रभर गळत होतं, माझ्याकडून त्यांना दोन घरं, आजच भूमीपूजन – अब्दुल सत्तारांची घोषणा
उद्धव ठाकरेंची व्होट बँक राज ठाकरे फोडणार? BMC निवडणुकीत करणार मोठा गेम