एका भिकाऱ्याचे शाही अंत्यसंस्कार! श्रद्धांजली वाहण्यासाठी झाली हजारोंची गर्दी, कारण वाचून अवाक व्हाल

आजकाल मोठमोठ्या घरात राहणारेही कोणी मेले तर चार माणसेही खांदे द्यायला अनेक ठिकाणी जमत नाहीत. अशा वेळी, या समाजात, या युगात, या देशात, भीक मागून जगणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंचा जमाव जमला होता. होय, ही बातमी कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील आहे.

ही बातमी एका अपंग भिकाऱ्याबद्दल संपूर्ण शहराला वेड लावणारी आहे. ही बातमी एका भिकाऱ्याच्या शेवटच्या भेटीची आहे!या जमावाला कोणीही लालूच दाखवून बोलावले नाही, की ही गर्दी कोणाच्या भीतीने बाहेर पडली नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीने त्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केल्यामुळे ही गर्दी झाली आहे.

ही गर्दी एका मतिमंद भिकाऱ्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यासाठी आली आहे. ही गर्दी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमली आहे, ज्यांनी एक-एक रुपया मागून आपला उदरनिर्वाह केला. आज त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सारे शहर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बल्लारीजवळ ४५ वर्षीय बसवा (लोक ज्यांना बस्या देखील म्हणतात) अपघातात मरण पावले. भीक मागून ते आपले जीवन जगत होते, मात्र त्यांच्या मृत्यूने हजारो लोक कसे जमले, यावर लोकं आश्चर्य व्यक्त करत आहेत. बसवांची भीक मागण्याची स्वतःची पद्धत होती. एक रुपयाच घ्यायचा. त्या बदल्यात ते लाखो-करोडों आशीर्वाद द्यायचे.

लोकं त्यांना जास्त पैसे द्यायला लागले तर ते घेत नसायचे. अधिक विनंती केल्यावर ते फक्त हात जोडायचे. पण लोकांची तळमळ असायची कि, बसवा कधी त्यांच्या दारात भीक मागायला येतील. कारण असे मानले जात होते की ज्या गल्लीतून ते भीक मागण्यासाठी जात असे तेथे गुडलक सुरू होत असे.

बसवांच्या आशीर्वादावर लोकांचा अढळ विश्वास दिवसेंदिवस वाढतच गेला. काळ बदलला पण विश्वास तुटला नाही. महागाई वाढतच राहिली पण बसवांनी कोणाकडून एक रुपयाही मागितला नाही. एक-एक रुपया करुन त्यांच्याकडे काही रक्कम जमा झाली की ते ती रक्कम गरजूंना मदत म्हणून देत असे. त्यासाठी त्यांनी कोणत्याही चौकात पोस्टर छापले नाही. मागणारा कधीही त्यांच्याकडे आला नाही. त्यांना माहिती मिळताच ते स्वत: गरजूंपर्यंत पोहोचायचे.

शुक्रवारी हा अपघात झाला. बसवा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बसवांना वाचवता आले नाही. बसवा यांचे शनिवारी निधन झाले. लोकं जगात असूनही कुणाचेच होत नाहीत. बसवा एकटे होते, पण ते ज्यांना भेटायचे ते त्यांचे व्हायचे. आज बसवा नाहीत, पण कर्नाटकातील बल्लारी आणि विजयनगरच्या गावातील गल्ल्या, घरांच्या, दुकानांच्या भिंतींमध्ये त्यांच्या आठवणी स्थिरावल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.