Share

काय छत, काय आमदार निवास, कसं रहायचं इथं? आमदार शहाजी बापू पाटलांच्या रूमचं कोसळलं छत

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. या बंडखोर आमदारांमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील होते. आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांची एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.(the-roof-of-mla-shahaji-bapu-patils-room-collapsed)

या ऑडिओ क्लिपमध्ये बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील गुवाहाटीमधील निसर्गाचे वर्णन केले होते. “काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ती हॉटेल… सगळं ओक्केमध्ये हाय”, असे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील आपल्या समर्थकाला फोनवरुन सांगत होते. त्यावेळी आमदार शहाजी बापू पाटील खूप चर्चेत आले होते.

पण सध्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या घराचं छत कोसळलं आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका महाराष्ट्र्रातील नागरिकांना बसला आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना देखील असाच फटका बसला आहे.

मुंबईतील आमदार निवासामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांची एक रूम आहे. या रूमचा नंबर आहे ३०२ असा आहे. या रूमच्या छताचा काही भाग पावसामुळे कोसळला आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची रूम सध्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूमचे छत कोसळण्याच्या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगितले जात आहे. पावसाळयात घराच्या पडझडीच्या अनेक घटना समोर येतात.

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील खूप चर्चेत आले होते. या ऑडिओ क्लिपवर एक गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलं होत. या गाण्याची खूप चर्चा झाली होती. बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमधील संवादांवरती मीम्स देखील व्हायरल झाले होते.

महत्वाच्या बातम्या :-
चित्रपटापेक्षा वेगळी धोनीची खरी लव्ह स्टोरी, ‘इथे’ झाली होती कॅप्टन कुल आणि साक्षीची पहिली भेट
पोन्नियिन सेल्वनमधील ऐश्वर्याचा महाराणीचा लुक व्हायरल, सौंदर्य पाहून घायाळ व्हाल, पहा फोटो
विप्रोमधील नोकरी सोडून युट्यूबवरून कमावतोय करोडो, जाणून घ्या अरूण कुशवाहाविषयी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now