सलाम! पत्नीचे दागिने विकून रिक्षालाच बनवलं अ‍ॅम्बुलन्स; गोरगरीबांना देतोय मोफत सेवा

भोपाळ | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रुग्णांना बेड, लस, ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने उपचार मिळण्यास वेळ लागत आहे.

कोरोना काळात नेते, उद्योजक, अभिनेते, खेळाडू यांनी मोठी मदत केली आहे. देशावर आलेल्या संकटात देशातून तर मदत होतेच. त्याचबरोबर बाहेरील देशांतूनही मदत करण्यात येत आहे. देशात सर्वसामान्य लोकांनीही कोरोना काळात आपल्या परीने सेवा केली आहे.

अनेकांनी पै पै जमा करून ठेवलेल्या पैशातून मदत केली आहे. अशातच मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातील एक रिक्षाचालक रुग्णांच्या मदतीला धावून आला आहे. रिक्षाचालकाने चक्क आपल्या रिक्षालाच रुग्णवाहिका बनवले आहे.

जावेद खान असं त्या ३४ वर्षीय रिक्षाचालकाचं नाव आहे. रिक्षा चालवून ते आपल्या कुटूंबाला सांभाळतात. गेल्या १८ वर्षापासून रिक्षा चालवून प्रवाशांना घेऊन जाण्याचं काम करत होते. मात्र कोरोना रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णांचा अत्यंत धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होत असल्याचं जावेदने पाहिलं आणि आपणही रुग्णांच्या मदतीला पुढं यायचं असं ठरवलं.

जावेदने रिक्षालाच रुग्णवाहिका करायचं ठरवलं. त्यासाठी जावेदने पत्नीचे दागिने विकले आणि आलेल्या पैशातून रिक्षाचं रुग्णवाहिकेत रुपांतर केले. रुग्णवाहिकेत जावेदने ऑक्सिमीटर, ऑक्सिजन सिलेंडर, पीपीई किट, औषधं, सॅनिटायझर ठेवले आहे.

एका वृत्त वाहिनेशी बोलताना जावेद म्हणला, दररोज ६०० रुपयांचा ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरावा लागतो. गेल्या १५ ते २० दिवसांपासून मी रुग्णांना रुग्णालयात नेण्याचं काम करतो. रुग्ण मला फोन करून बोलावून घेतात. आतापर्यंत ९ गंभीर रुग्णांना रुग्णालयात घेऊन गेलो आहे.

दरम्यान जावेद खान रिक्षा चालवून परिवाला सांभाळत होता. रुग्णांसाठी जावेदने चक्क पत्नीचे दागिने विकून रुग्णवाहिका बनवली. आपलं उदरनिर्वाहाचं साधन बंद करून रुग्णांची मोफत सेवा करत असल्याने जावेदच्या कार्याचे कौतूक होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनावरून सरकारवर टीका करणाऱ्या लोकांवर कारवाई केली तर…; सुप्रीम कोर्टाने केंद्राला ठणकावले
धक्कादायक! मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन
कोरोनात लाखो कमवलेल्या या ड्रायव्हरचं मार्केटींग बघून बडे मार्केटींग गुरू तोंडात बोट घालतील
बुधवार पेठेतील महिलांसाठी ही तरुणी ठरलीय देवदुत; करतेय असं काम की तुम्हीही म्हणाल वा!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.