रिक्षाचालकाच्या लावणीने सेलिब्रिटींना घातली भुरळ, आता मिळतेय चित्रपटात काम करण्याची संधी

बारामती | ‘जाऊ द्या ना घरी वाजले की बारा’ लावणीवर बारामतीतील एका रिक्षाचालकाने केलेला ठुमकेबाज डान्स तुम्ही पाहिलाचं असेल. बारामती पासून जवळच असलेल्या गूणवडी गावचे बाबाजी कांबळे यांनी रिक्षा स्टॅन्डवर तुफान लावणी सादर केली होती. सोशल मिडियावर त्यांच्या नृत्याने धूमाकूळ घातला होता.

बाबाजी कांबळे यांच्या डान्सचे अनेकांनी कौतूक करत त्यांच्या कलेला दाद दिली होती. त्यांचा नृत्य पाहून मराठमोठ्या चित्रपट निर्मात्याने त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. ‘एलिजाबेथ एकादशी’ चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक घनशाम येडे यांनी थेट बारामतीमध्ये जाऊन बाबाजी कांबळे यांना चित्रपटात झळकण्याची संधी दिली आहे.

दिग्दर्शक घनशाम येडे यांच्या ‘कवच’ आणि ‘चल रे फौजी’ या चित्रपटात कांबळे भूमिका निभावणार आहेत. चित्रपटात काम करण्याची संधी चालून आल्याने बाबाजी कांबळे आणि त्यांच्या कूटूंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाबाजी कांबळे यांनी रिक्षा स्टॅन्डवर लावणी सम्राज्ञीला करता येणार नाही असा भन्नाट डान्स केला होता. उपस्थित लोकांना त्यांचं नृत्य पाहून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करण्याचा मोह आवरला नाही. अनेकांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला होता. त्यातूनचं त्यांना प्रसिध्दी मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या-
फक्त ३५०० रुपयांमध्ये सुरु केला ‘हा’ भन्नाट व्ययवसाय, आता महिन्याला करतेय लाखोंची कमाई
एकाचवेळी ४ मुलांसोबत मुलीचं होतं लफडं, बापाला समजताच घडला ‘हा’ प्रकार
बापरे! मासे खाताय तर वेळीच व्हा सावध, तुमच्या पोटात जातय प्लास्टिक; वाचा…
झाला खुलासा! ‘या’ अभिनेत्रीचं बुमराह-संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.