..म्हणून रिक्षाचालकाने परत केले चाळीस लाखांचे दागिने; किस्सा वाचून तुम्हाला कौतुक वाटेल

चेन्नई | कोरोनाच्या महामारीमुळे सर्वात जास्त आर्थिक संकटात सापडले आहेत ते म्हणजे रिक्षाचालक. कारण हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांना कोरोनाच्या काळात प्रवासी मिळणे कठीण झालं होतं. असं असतानाही चेन्नईतील कोनगाव येथील तरूण रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेले चाळीस लाखाचे दागिने प्रामाणिकपणाने परत करत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

श्रवण कुमार असं त्या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. दिवसरात्र मेहनत करून अधिकारी बनायचं श्रवणचं स्वप्न आहे. एके दिवशी एक प्रवासी श्रवणच्या रिक्षात बसला त्याला रिक्षातून श्रवणने सोडले. त्याची दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरून गेला. आणि नंतर श्रवणने पाहिले की प्रवाशाची बॅग रिक्षात विसरली आहे.

श्रवणने तात्काळ ही बॅग जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जमा केली. पोलिसांनी पाहिले की त्यात तब्बल चाळीस लाखांचे दागिने आहेत. दुसरीकडे ज्या व्यक्तीची ही बॅग होती तो पोलिसांत तक्रार दाखल करायला आला. पण त्याची बॅग आधीच श्रवणने पोलिसांकडे जमा केल्याने त्याला फार आनंद झाला. आणि त्याने श्रवणचे कौतूक केले.

दरम्यान श्रवणने सांगितले की, माझ्या रिक्षात ही व्यक्ती बसल्यानंतर ती सतत मोबाईलवर बोलत होती आणि मग गडबडीमध्ये त्याची दागिन्यांची बॅग विसरून गेला. मग लगेच मी बॅग पोलिसांकडे जमा केली. सध्या श्रवणच्या या प्रामाणिकपणाचे चेन्नईमध्ये कौतूक होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.