विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेची काही मते फुटल्याचे समोर आले आहे. यादरम्यान काल संध्याकाळपासून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.(The reasons for Eknath Shinde’s displeasure came in front)
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे नेमके कोणते आमदार आहेत? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे पक्षावर नाराज होते.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची सात कारणे सध्या समोर आली आहेत. शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने ही कारणे सांगितली आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रिपद आहे. पण गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिपदाच्या कामामध्ये हस्तक्षेप करत होते.
मंत्रिपद असूनही मनासारखे काम करता येत नाही. निर्णय घेता येत नाहीत. यामुळे एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. तसेच एकनाथ शिंदे यांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागत होती. त्यामुळे देखील एकनाथ शिंदे नाराज होते. सुरवातीला एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगला संवाद होत होता.
पण काही काळानंतर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील संवाद कमी होत गेला. तसेच शिवसेनेचे इतर नेत्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद वाढू लागला. यामुळे आपल्याला डावललं जातंय, अशी भावना एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली. याशिवाय राजकारणात सक्रिय झालेले शिवसेनेचे नेते आणि आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांच्यावर पक्षाकडून महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.
विधान परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी देताना एकनाथ शिंदे यांना पक्षाकडून डावलण्यात आलं. तसेच या निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्यावर सोपवण्यात आली. यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. तसेच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या वक्तव्यांवर देखील एकनाथ शिंदे नाराज होते.
महत्वाच्या बातम्या :-
‘या’ कारणांमुळे पक्षावर नाराज होते एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या गोटातून मोठी माहिती आली समोर
महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय होणार? वाचा तुमच्या मनात घोळत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
…तरच आम्ही बंड मागे घेऊ; एकनाथ शिंदेंसोबत मिळून शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी मांडली भूमिका