Uddhav Thackeray : मुंबई (Mumbai) येथे शिवसेना (उबाठा) पक्षात आज एक महत्त्वाचा प्रवेश पार पडला. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे (Bhai Keshavrao Dhondge) यांचे पुत्र पुरुषोत्तम धोंडगे (Purushottam Dhondge) यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. या वेळी अंबादास दानवे (Ambadas Danve), विनायक राऊत (Vinayak Raut) आणि रोहिदास चव्हाण (Rohidas Chavan) हे उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर बोलताना ठाकरे यांनी सध्याच्या पावसाळी स्थितीबद्दल सरकारवर कडाडून निशाणा साधला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “राज्यात पाऊस (Rain) आणि पूरस्थिती वाढत असतानाही प्रशासन योग्य तयारीत दिसत नाही. नांदेड (Nanded)मध्ये लोकांचे जीव जात आहेत आणि तुम्ही राजकारण करण्यात मग्न आहात.”
“राजकारणात चोरांचा बाजार सुरू आहे”
राजकीय पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला. “आज सगळं चोरबाजार झालं आहे. कोणी मत चोरतंय, कोणी पक्ष चोरतंय. या धावपळीत माणूस कुठे हरवला आहे” अशी टीका त्यांनी केली.
तसेच, सोशल मीडियावर “मुंबईत भगवं वादळ येत आहे” अशी टीका करताना त्यांनी प्रतिप्रश्न केला. “हे नैसर्गिक वादळ पाहिलंत का? आज जिथे कधीच पाणी नव्हतं तिथेदेखील पाणी तुंबतंय… विमानतळाचा फोटो पाहिलात का? आता बंदर वेगळं करायची गरज नाही, विमानही तिथेच धरणार!”
११ गावांच्या पुनर्वसनावरून सरकारवर प्रहार
ठाकरे म्हणाले की, “धरणाचं काम सुरू करण्याआधी ११ गावांचं पुनर्वसन व्हायला हवं होतं. पण इथे माणसांपेक्षा कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरायचे याला प्राधान्य दिलं गेलं. म्हणून आज ही मानवनिर्मित आपत्ती ओढवली आहे”.
वेधशाळेलाही टोमणा
भाषणाअखेरीस त्यांनी हवामान वेधशाळेला (Meteorological Department) देखील टोला लगावला –
“आज बऱ्याच दिवसांनी एकदा तरी वेधशाळेचा अंदाज खरा ठरला! त्यांनी काल सूचना दिल्या आणि आज खरोखर पाऊस कोसळतोय.”
ते पुढे म्हणाले, “तुम्ही ज्या ११ गावांमध्ये जाणार आहात, तिथली आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. जर वेळेत पुनर्वसन केले असते, तर कुणालाही जीव गमवावा लागला नसता.”