लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला?, माजी प्राध्यापकाने कोरोना लस घेण्यास  दिला नकार

पंजाब | देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लस, ऑक्सिजन, बेड यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करत आहे.

देशात सध्या कोरोनावरील कोव्हॅक्सीन आणि कोविशील्ड लस मिळत आहेत. देशातच लस बनत असल्याने नागरीकांनी या लस बनवणाऱ्या कंपन्यांचे  कौतूक केले आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना योध्यांना लस देण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ४५ वर्ष वयोगटाच्यावरील नागरिकांना लस देण्यात आली होती. लसीचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरू होत आहे.

कोरोना लसींवरून देशातील वातावरण चांगलच रंगू लागलं आहे. अशातच पंजाबमधील एका व्यक्तीने लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने लस घेण्यास नकार दिला आहे. यामुळे देशभरामध्ये चर्चा होत आहे.

पंजाबमधील ७४ वर्षीय चमनलाल हे उच्च शिक्षित आहेत. जवाहरलाल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. ते सध्या निवृत्त झाले आहेत. चमनलाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्र लिहले आहे.

पत्रात त्यांनी म्हटले की, “मला कोरोना लसीची गरज आहे. मात्र माझे काही वैयक्तिक आणि सामाजिक आक्षेप आहेत. पंजाबचा आणि भारताचा नागरिक म्हणून मी काही आक्षेप नोंदवू इच्छितो. मी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली नाही. मी आजही लस घेण्यास उत्सूक नाही”.

ते पुढे म्हणाले, “कोरोना लस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. हा फोटो प्रमाणपत्रावर अनिवार्य आहे. जगातील इतर कोणत्याही देशात लसीकरण प्रमाणपत्रावर राजकीय नेत्याचा फोटो छापण्यात आला नाही. सत्ताधारी पक्षाच्या बेजबाबदारपणामुळे देशात कोरोनाचे बळी गेले आहेत”.

“कोरोना लसीकरण राष्ट्रीय अभियान आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर आरोग्य अधिकाऱ्याची स्वाक्षरी हवी होती. मात्र भारतात सत्तेतील नेत्याचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावर देण्यात येत आहे. लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो लावला जात असेल तर कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो लावा”. असं चमनलाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान देशात कोरोना रुग्ण संख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाल्यांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ झाली आहे. देशातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?; गोपीचंद पडळकरांचा राजेश टोपेंवर घणाघात
शाहरुख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली; तरुणीचा शाहरुख खानवर खळबळजनक आरोप
लग्नात घुसून वऱ्हाडींवर कठोर कारवाई करणाऱ्या ‘त्या’ कलेक्टरचे भाजप सरकारकडून निलंबन
आनंदाची बातमी! सिरमने कोरोना लसीची किंमत केली कमी; वाचा काय आहे किंमत..

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.