कोरोना रुग्णांची लूटमार थांबणार; खाजगी रुग्णवाहिका आता राज्य सरकार ताब्यात घेणार

 

मुंबई | राज्यातील कोरोना संकटाने थैमान घातले आहे. तसेच राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

अशा वेळेस कोरोना रूग्णांना रुग्णालयात पोहचवण्यासाठी, खाजगी रुग्णवाहिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहे.

या प्रकरणी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकार खाजगी रुग्णवाहिका आणि वाहने सरकारच्या ताब्यात घेण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांची होणारी लूटमार आता थांबवता येणार आहे.

दरम्यान, खाजगी रुग्णवाहिका आणि वाहने अधिग्रहित करताना त्यांचा दर निश्चित करून उपलब्ध करून दिले जाणार आहे.

तसेच या रुग्णवाहिका आणि वाहने रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध असणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.