एका वर्षात १ हजार टक्क्यांनी वाढली टाटांच्या ‘या’ शेअरची किंमत, ६ महिन्यात १ लाखांचे झाले ६.३६ लाख

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) (TTML) च्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षभरातील नोंदी पाहिल्या तर त्यात १००० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यांनी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले होते, त्यांना ६ महिन्यांनंतर ६.३६ लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.

या भरघोस परताव्यामुळे टाटाचा हा शेअर सध्या चर्चेत आहे. पूर्वी या कंपनीचे नाव टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड होते जे आता ‘टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड’ (टीटीएमएल) म्हणून ओळखले जाते. टीटीएमएलच्या शेअर्समध्ये गेल्या ६ महिन्यांत ५३८ टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच ६ महिन्यांत त्याच्या शेअरच्या किमतीत ५३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२० मे २०२१ रोजी या स्टॉकची किंमत १२.५५ रुपये होती, तर २० नोव्हेंबरला त्याची किंमत ८०.५५ रुपये नोंदवली गेली. या ६ महिन्यांत गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक सहा पटीने वाढवली आहे. मागील रेकॉर्डवर नजर टाकल्यास या शेअरची किंमत १ महिन्यात ४४ टक्क्यांनी वाढली आहे.

सेन्सेक्समध्ये १.९ टक्के घसरण होऊनही टीटीएमएलच्या समभागाची ही स्थिती आहे. त्याच्या स्टॉकमध्ये ३ महिन्यांत १०९% वाढ झाली आहे. एक वर्षाचा लेखाजोखा पाहिला तर या शेअरमध्ये १,०१९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत, टाटा समूहाच्या कंपन्यांकडे TTML मध्ये ७४.३६ टक्के होल्डिंग होते, त्यापैकी  टक्के७४.३६ टाटा टेलिसर्व्हिसेसने नोंदवले होते.

यानंतर टाटा सन्सची १९.५८ टक्के आणि टाटा पॉवर कंपनीची ६.४८ टक्के नोंद झाली. याशिवाय TTML मध्ये वैयक्तिकरित्या २३.२२ टक्के शेअर्स होते. Tata Teleservices किंवा TTSL ची उपकंपनी TTML, एक वेगाने वाढणारी कंपनी आहे. ही कंपनी एंटरप्राइझ क्षेत्रात मोठी भूमिका बजावत असल्याचे दिसते.

ही कंपनी व्हॉइस, डेटा आणि व्यवस्थापित सेवा प्रदान करते. ही कंपनी टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस (TTBS) नावाने आपली सेवा पुरवते. टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसने अलीकडेच व्यवसायासाठी देशातील पहिली स्मार्ट इंटरनेट लीज लाइन सुरू केली आहे. याद्वारे अत्यंत कमी किमतीत हायस्पीड इंटरनेट नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

क्लाउड आधारित सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जेणेकरून डेटा सुरक्षित ठेवता येईल. जे व्यवसाय डिजिटल आधारावर चालत आहेत, त्यांना या लीज लाइनमुळे खूप मदत मिळेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षितता अंतर्भूत करण्यात आली असून, त्यासोबतच वेगवान इंटरनेट सुविधाही देण्यात आली आहे.

टाटाची ही लीज लाइन व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायातील फिशिंग, रॅन्समवेअर इत्यादीपासून संरक्षण प्रदान करते. TTBS ने मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत या सहामाहीत आपला तोटा झपाट्याने कमी केला आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल-सप्टेंबरमध्ये १,४१० कोटी रुपयांची तूट ६३२ कोटींवर आणली आहे.

TTML ने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीचे भांडवल राखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील असे सूचित करणारे प्रवर्तकाकडून नुकतेच समर्थनाचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार, कंपनी तिच्या निधीच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे आणि पूर्वीप्रमाणेच आपला व्यवसाय सुरळीत सुरू ठेवेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.