सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण, तर चांदीची चमकही उतरली; पुढे राहील ‘असा’ कल

मुंबई | कोरोना संकटातही मोठी भरारी घेणाऱ्या सोन्याचा दर आता पुन्हा खाली उतरताना दिसून येत आहे. त्यातल्या त्यात या आठवड्यात तर सोन्याच्या मोठी दरात घसरण पाहायला मिळत आहे.

सध्या १० ग्रॅम सोन्याचा दर ५२ हजार ००१ स्थिरावला आहे, तर १ किलो चांदी दर ६६ हजार ९५४ रुपये झाला आहे. सुरुवातीच्या दरात आताच दर चांगलाच उतरला आहे.

ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली होती. ७ ऑगस्टला सोन्याचा दर १० ग्रॅमला ५६ हजार २०० रुपये एवढा होता. मात्र १५ दिवसात सोन्याचा भाव ४ हजार २०० रुपये एवढा खाली आला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दर खाली येताना दिसत आहे. प्रति औस सोन्याचा दर २ हजार डॉलरच्या खाली आला आहे, सध्या दर १ हजार ९४२ डॉलर आहे.

तर जागतिक पातळीवर अमेरिका-चीनमध्ये असणारा तणाव आणि कोरोना प्रादुर्भाव येत्या काळात कमी नाही झाला तर सोन्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.