Share

Navneet Rana : मेहनतीने पोलिस अधिकारी झालेत तुमच्या सारखे लोकांना किराणा वाटून…; पोलिस पत्नीने राणांना सुनावले

navneet raana

Navneet Rana : अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहाद प्रकरणावरून पोलीस स्टेशनमध्ये घुसून अमरावतीतील पोलिसांसोबत हुज्जत घातल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. अमरावतीच्या एका मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवले असल्याची तक्रार त्यांनी केली होती. तसेच या प्रकरणाची विचारपूस केली असता पोलिसांनी त्यांचा फोन कॉल रेकॉर्ड केला असल्याची तक्रार त्यांनी केली होती.

या गोष्टीमुळे त्यांनी जवळपास २० मिनिटे पोलिसांसोबत हुज्जत घातली. तुम्हाला माझा फोन कॉल रेकॉर्ड करण्याची परवानगी कुणी दिली?, असा सवाल त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला केला होता. हे प्रकरण सगळीकडेच प्रचंड गाजले होते.

त्यानंतर त्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. सातारा येथून पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या मुलीने लव्ह जिहाद वगैरे काहीच नसून मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे घर सोडून गेली असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली असल्याचा गंभीर आरोपही केला.

या सगळ्या घटनेनंतर नवनीत राणांची ज्या पोलीस अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली त्यांच्या पत्नीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांना खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, खासदार मॅडम गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर आक्षेप घेत आहेत. त्यांना माझी विनंती आहे की मॅडम तुमच्याकडे एवढी पावर आहे, एक मोठे केंद्रीय खाते तुमच्या हातात आहे. त्यामुळे मी तुम्हाला एकच विनंती करते की, ज्या पोलिसांचा तुम्ही एवढा राग करत आहात त्या पोलिसांची सिक्युरिटी आधी काढून टाका.

तुम्हाला ती सिक्युरिटी घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही जिथे कुठेही फिरत आहात तिथे तुमच्यामागे असलेले पोलीस कर्मचारी हे शासनाचे आहेत. जेवढेही पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी आहेत ते सगळे स्वतःच्या मेहनतीने तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, तुमच्यासारखे लोकांना किराणा वाटून नाही. आजपर्यंत अनेक छोट्याछोट्या गोष्टींसाठी तुम्हाला पोलिसांची सुरक्षा लागत असते.

सर्वात आधी तुम्ही ही सुरक्षा घेणे थांबवा. कारण तुमची जी कालची बोलायची भाषा आहे त्यावरून तुम्हाला पोलिसांची गरज नाही. मी एका पोलिसाची पत्नी म्हणून बोलते आहे. माझा नवरा पोलिसांमध्ये आहे. तो दिवसरात्र कशी ड्युटी करतो, कोणत्या सणासुदीला आमच्यासोबत असतो नसतो हे आम्हाला माहिती आहे. आम्ही आमच्या अडीअडचणी कशा दूर करतो व कशा पद्धतीने समाजाचा सामना करतो हे आमचे आम्हालाच माहिती आहे.

प्रत्येकवेळी तुम्ही पोलीस पोलीस करत असता तर तुम्ही एकदा पोलिसांचे प्रोटेक्शन बाजूला ठेवून जनतेमध्ये येऊन दाखवा. तेव्हा तुम्हाला समजेल की पोलीस नसल्यावर काय होते. तुम्ही स्वतःला जनप्रतिनिधी म्हणवून घेता. परंतु जनप्रतिनिधीची भाषा ही प्रेमाची असली पाहिजे. माझे पती अधिकारी आहेत. त्यांना या पदावर पोहोचण्यासाठी कितीतरी कष्ट, मेहनत घ्यावी लागली. त्या पदाची काहीतरी गरिमा आहे. अशा शब्दात पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने नवनीत राणांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या
Akshay Kumar : पत्नीला सार्वजनिक ठिकाणी काढायला लावली पँटची चैन; ‘या’ ५ घटनांमुळे वादात सापडला अक्षय कुमार
Share Market : १५ दिवसांत पैसे झाले दुप्पट! ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Satara : आता राजेच राजांचा कडेलोट करणार? साताऱ्याच्या दोन्ही राजांमधील चिघळलेला वाद पोहचला कडेलोटापर्यंत
Vani: तब्बल २ हजार किलोचा शेंदूर हटवला, समोर आले सप्तशृंगी देवीचे मूळ रूप; फोटो पाहून भारावून जाल

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now