हिंगोलीत रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक आमदार या नाचणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर पैसे उधळताना दिसत आहे. आता या पोलीस(Police) अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.(the police officer and mla dance on ramnavmi Procession)
हिंगोली जिल्ह्यातील औंढा शहरामध्ये रामनवमीच्या निमित्ताने मिरवणुक निघाली होती. यावेळी पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारी मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचत होते. या पोलीस अधिकाऱ्यांसोबत शिवसेना आमदार संतोष बांगर देखील नाचत होते. पोलीस अधिकारी नाचत असताना शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्यावरून पैसे ओवाळले.
ही मिरवणुकीतील दृश्ये त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही व्यक्तींनी कॅमेऱ्यात शूट केली आहेत. त्यावेळी कोणीतरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी मिरवणुकीत नाचणाऱ्या या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
औंढा शहरात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात तेथील नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. पण त्याविरोधात अद्याप पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट पोलीस मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शांतता आणि सुव्यवस्था यांची जबाबदारी असणारे पोलिसच मिरवणुकीत नाचताना दिसत असल्यामुळे औंढा शहरातील नागरिक संतापले आहेत. त्यांनी पोलिसांवर टीका देखील केली आहे. आत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलिसांच्या या कृतीवर कोणती कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये देखील अशीच घटना घडली होती. एका मिरवणुकीत काही पोलीस अधिकाऱ्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. राजस्थानमधील पोलिसांच्या या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या अधिकाऱ्यांनावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंना दंगल पेटवायची असेल तर त्यांनी आधी स्वताच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं; सुजात आंबेडकरांचं चॅलेंज
ईशान किशनला कोट्यवधी रुपये मिळाल्यानंतर वडील पोहोचले होते हॉस्पिटलमध्ये, किस्सा वाचून पोट धरून हसाल
काय सांगता? ‘या’ अभिनेत्रीच्या मिशांवर फिदा झाला होता करण जोहर, केलं होतं तिला प्रपोज