Eknath Shinde : राज्यात शिंदे-फडणवीस हे नवीन सरकार आल्यापासून अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. तसेच वेगवेगळ्या योजनाही राबवल्या जात आहेत. हीच गोष्ट लक्षात घेत एका पोलिसाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत एक विनंती केली आहे.
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका पोलिसाने दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. पोलीस निरीक्षक आर. आर. चव्हाण यांनी हे पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनाथांचा नाथ म्हणत हे पत्र लिहिण्यात आले आहे.
आर. आर. चव्हाण यांनी या पत्रात लिहिले की, शासनाच्या धोरणानुसार पोलीस दल वगळून इतर कर्मचाऱ्यांसाठी फक्त ५ दिवसांचा आठवडा आहे. याप्रमाणे वर्षात ५२ शनिवार येतात. तसेच प्रत्येक वर्षात पोलीस वगळून इतर सर्वांसाठी २४ शासकीय सुट्ट्या असतात! परंतु पोलीस मात्र या ५२+२४=७६ दिवस बारा-पंधरा दिवस दररोज कर्तव्यावर असतो.
तसेच कायद्याने व माणुसकीने बघायला गेलं तर पोलिसांना ७६ दिवसांचा पगार दिला पाहिजे, परंतु आम्हा पोलिसांना व आमच्या कुटुंबियांना संपूर्ण आयुष्य तडजोड करायची सवय असल्यामुळे तडजोड करून फक्त एक महिन्याचा पगार आम्हाला दिवाळी बोनस म्हणून मिळावा अशी विनंती शासनाला अनेक वर्षांपासून करत आहे! पण पोलिसांची संघटना नसल्यामुळे व पोलिसांना कोणी वाली नसल्यामुळे शासनामार्फत दखल घेतली जात नाही. असे ते म्हणाले आहेत.
पोलीस दलाची अवस्था अनाथासारखी झाली आहे.! सध्या महाराष्ट्रातील सर्व जनता म्हणते आहे की महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हे दयाळू “अनाथांचा नाथ एकनाथ” आहे! तसेच माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेदेखील पोलिसांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देतात!, असेही या पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे आम्हा पोलिसांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून ७६ दिवस बारा-पंधरा तास जास्तीचे कर्तव्य केल्यामुळे मोबदल्यात दया दाखवून देशातील इतर राज्यांप्रमाणे एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची कृपा करावी अशी आपल्याकडून आम्हा पोलिसांची अपेक्षा आहे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : अखेर निर्णय झाला! एकनाथ शिंदे होणार नवे शिवसेना पक्षप्रमुख
eknath shinde : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचाही एकनाथ शिंदेंना पाठिंबा, निवडणूक आयोगासमोरील लढाईबाबत केलं मोठं विधान
Eknath Shinde : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो – एकनाथ शिंदे
Supreme Court : एकनाथ शिंदे कोणत्या अधिकाराने निवडणूक आयोगाकडे गेले? सुप्रीम कोर्टाचा मोठा प्रश्न