Crime : मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणी वसूल करणाऱ्या एका तरुणाला अटक केल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. या तरुणाने आतापर्यंत अनेकांकडून खंडणी उकळली आहे. मात्र, त्याला पकडण्यात आता पोलिसांना यश आले आहे.
अरबाज खान असे या आरोपीचे नाव आहे. तो १९ वर्षांचा आहे. त्याने एका डॉक्टरची फसवणूक करत त्याच्याकडून खंडणी उकळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
त्याचे झाले असे की, नोव्हेंबर २०२१ मध्ये घाटकोपर येथील एका डॉक्टरला एक व्हिडीओ कॉल आला होता. हा कॉल डॉक्टरने उचलल्यानंतर त्याला फोनवर पुढे एक महिला दिसली. या महिलेने डॉक्टरला बोलण्यात गुंतवले व ती विवस्त्र झाली. त्यानंतर डॉक्टरने तिचा फोन ठेवला.
पुढे काही वेळानंतर त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. डॉक्टरने हा फोन उचलला तेव्हा फोनवरील व्यक्ती त्याला आधी झालेल्या महिलेसोबतच्या व्हिडीओ कॉलविषयी बोलू लागला. तसेच हा व्हिडीओ कॉल अश्लील असल्याने याबाबत कारवाई करण्याची धमकी त्याने डॉक्टरला दिली.
त्यानंतर तो डॉक्टरला पैसे मागू लागला. त्या डॉक्टरने भीतीपोटी त्याला काही पैसेही पाठवले. मात्र, त्या व्यक्तीची पैशांची मागणी काही केल्या थांबत नव्हती. त्यामुळे शेवटी डॉक्टरने पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीची तक्रार केली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्यासह गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा गुन्हेगार राजस्थानमध्ये असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांचे पथक राजस्थानमध्ये पोहोचले. पोलिसांनी राजस्थानातील भारतपूर येथून अरबाज खानला ताब्यात घेतले.
काही ॲप्सचा वापर करत अरबाज खान अश्लील व्हिडिओही बनवत असे. तसेच एखाद्या व्यक्तीला अरबाज व्हिडीओ कॉल करत असे. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला धमकी देत त्याच्याकडून पैसे घेत असे. त्याने आतापर्यंत अनेक ऑनलाईन ॲप्सचा माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले असल्याची महिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
MNS : “आज राऊतांची खुर्ची रिकामी आहे उद्या तुमचीपण….”; ठाकरेंना मनसेचा खोचक टोला
crime news : मावा खाताना घडलं विपरीत; क्षणात गेला जीव, प्रसंग वाचून उडेल थरकाप
..पण त्यांना कॉमेडी समजली नाही, राजू श्रीवास्तव यांच्यावर कॉमेडियनची अभद्र कमेंट, चाहते संतापले
‘या’ चित्रात लपले आहेत 6 प्राणी, 99 टक्के लोकं झालेत फेल, पहा तुम्हाला जमतंय का?