अमानुषतेचा कळस! कोरोना झाल्याचे समजताच वयोवृद्ध आईला मुलाने दिले बसस्थानकावर सोडून

 

हैद्राबाद। जगात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा उद्रेक वाढत चालला आहे. अशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. या खडतर काळात अनेक ठिकाणी माणुसकीचे खरे रंग पहायला मिळत आहेत.

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात वयोवृद्ध आईला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मुलाने तिला बसस्थानकात एकटे बसवून घटनास्थळावरुन घरी जाणे पसंत केले.

स्थानिक लोकांना एक वयोवृद्ध स्त्री बसस्थानकात बसून असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजले.

काही दिवसांपूर्वी ही महिला गोव्यात आपल्या मुलीकडे गेली होती. या प्रवासादरम्यान तिला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

आपल्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलगा व्यंकटेशने तिला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी बसस्थानकावर नेले. तिकडे तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो.

असे सांगून व्यंकटेश जो गेला तो परत आलाच नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कोरोनाने माणसातली माणुसकी मारून टाकल्याच्या अशा घटना सारख्या घडताना दिसत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.