VIDEO: नदीत पिकनिक पडली भारी, कुटुंब अडकले पुरात, पुढे जे झाल तुम्हीच पहा

नागपूर। सध्या गेले वर्षभर देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे गेले वर्षभर सर्व घरी राहून कंटाळले आहेत. अशातच सध्या कोरोना विषाणूचे रूग्ण कमी झाल्याने अनेक लोक आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी जात आहेत. अशातच पावसाचे दिवस सुरू झाल्याने अनेकांना पाण्याच्या ठिकाणी फिरायला जायला आवडत असते.

असंच एक नागपूरमधील कुटुंब पिकनीकला गेले असता त्यांना ही पिकनीक चांगलीच महागात पडली आहे. छिंदवाड येथील सौसरच्या घोघरा धबधब्याजवळ तब्बल 3 तास हे कुटुंब पुराच्या पाण्यात अडकलं होतं. अखेर मोठ्या मुश्लिकीने या कुटुंबातील 12 जणांची सुटका करण्यात आली आहे.

हे कुटुंब मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथील सौसरच्या घोघरा धबधबा पाहण्यास गेले होते. मंगळवारी दुपारी हे कुटुंब नदीतील एका उंच भागावर जाऊन निवांत बसले होते. पण, अचानक पाण्याची पातळी वाढली.

नदीने काही क्षणात रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे एकाच कुटुंबातील 12 जण पुराने वेढले गेले होते. त्यांच्यासोबत इतरही काही लोकं अडकली होती. आपल्याला बाहेर काढण्यासाठी आरडाओरडा केला त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. व 3 तास अथक प्रयत्न केल्यानंतर या सर्वांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.

महत्वाच्या बातम्या
मुलांना सांभाळणारी महिला कर्मचारीच बनली भक्षक; अल्पवयीन मुलांचे करत होती लैंगिक शोषण
‘लगान’ चित्रपटातील गौरी आठवते का? एका चुकीमूळे बॉलीवूड सोडावे लागले होते
लग्न झाले मात्र ‘या’ कारणामुळे नवरी सासरी गेली नाही, अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना

हृदयद्रावक! रेल्वे रुळांवर पडलं होतं तरूणाचं शव; खिशातील सुसाईड नोट वाचताच सर्व हादरले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.