Amit Shah : मुंबई दौऱ्याच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत चूक झाल्याची बातमी समोर आली होती. काही दिवसांपूर्वी अमित शाह त्यांच्या कुटुंबियांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाकरिता गेले होते. यावेळी एक तरुण गृहमंत्रालयाचा अधिकारी बनून बराचवेळ अमित शाह यांच्या मागेपुढे करत होता.
त्याने आपली ओळख गृहमंत्रालयाचा अधिकारी असल्याची दिली होती. मात्र, तो कुठलाही अधिकारी नव्हता. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हेमंत पवार असे या तरुणाचे नाव आहे. तो धुळे जिल्ह्यातील दाऊळ या गावचा रहिवासी असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
हेमंत पवारने केंद्रीय गृह खात्याचा सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी त्याच्या गळयात गृह मंत्रालय/ मिनिस्ट्री ऑफ होमअफेअर्स असे नाव असलेली आयकार्डसोबत असणारी निळया रंगाची रिबीन लावली होती. तसेच तो अमित शाह यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाजवळही दिसला.
त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. हेमंत पवारचे वडील निवृत्त पोस्टमन आहेत. ते सध्या शेती करतात. दरम्यान, हेमंतच्या आईवडिलांना त्याच्या कामाबद्दल कोणतीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी हेमंतला ताब्यात का घेतलं याबाबतही कुठलीही कल्पना नसून आम्हाला चॅनलवरच्या बातम्या बघून माहिती मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच हेमंतच्या वडिलांनी हेमंत कधीच चुकीचे काम करू शकत नाही. त्याला चौकशी करून सोडून देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. हेमंतला अटक केल्यानंतर त्याने राजकीय व्यक्तींशी जवळीकता असल्याचे सांगून त्याद्वारे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी हे कृत्य केले असल्याचे कुबल केले.
या घटनेनंतर आता सीआरपीएफने कडक पावले उचलली आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांना सीआरपीएफ एक पत्र लिहिणार आहे. सीआरपीएफच्या जवानांनी पाहिलेला आरोपी हा संशयास्पद फिरत होता. त्या परिसरातली सुरक्षा राज्य पोलिसांकडे आहे. त्यामुळे सुरक्षा पुरवण्यात येणाऱ्या व्यक्तीला सर्व चौकशी करूनच सुरक्षा देण्यात यावी, असे सीआरपीएफने म्हटले आहे. तसेच सुरक्षा पुरवण्यात आलेल्या व्हीआयपी व्यक्तीकडे कुणालाही जाण्याची परवानगी देऊ नये, असेही सीआरपीएफने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
Aditya Thackeray : याकूब मेमनच्या थडग्यावरून आरोप करणाऱ्या भाजपची आदित्य ठाकरेंनी केली पोलखोल, म्हणाले…
राणांचा लव्ह जिहादचा दावा खोटा? पहाटे पोलिस स्टेशनमध्ये येऊन तरुणीचे राणांवर गंभीर आरोप
सातारच्या भोसलेंनी देखील शिंदेंना दिलं समर्थन; उद्धव ठाकरेंच्या हातून बालेकिल्ला निसटणार? ‘अशी’ बदलली राजकीय समीकरण
Politics: आता लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला बसणार मोठा धक्का, सर्वेतून झाला मोठा खुलासा






