Share

Indian Idol : गाणे कसेही गायले तरी कौतुक कराच! इंडियन आयडाॅलच्या आयोजकांनी दिली होती ताकीद

Indian Idol

Indian Idol : सोनी टीव्हीवरचा सुप्रसिद्ध शो म्हणजे इंडियन आयडल. सध्या इंडियन आयडलचा बारावा सीजन सध्या सुरू असून रविवारी गायक किशोर कुमार स्पेशल एपिसोड प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र याला एक वेगळेच गालबोट लागले. या एपिसोडची शूटिंग देखील पूर्ण झाली आहे.(Indian Idol Season 12, Amit Kumar, Sony TV, Kishore Kumar Special Episode)

यामध्ये किशोर कुमार यांचा मुलगा गायक अमित कुमार हे देखील उपस्थित आहेत. परंतु सध्या हा कार्यक्रम वादात सापडला आहे. याचे कारण जरा वेगळे आहे. मला या एपिसोडमध्ये सगळ्यांचे कौतुक करायला सांगितले होते, असे अमित कुमार यांनी म्हटले आहे. यामुळे हा शो आता चांगलाच वादात सापडला आहे.

गाणे कसेही गायले तरी कौतुक करायचे असे सांगितले गेले. तसेच मला हा एपिसोड बिलकुल आवडलेला नाही. हा एपिसोड थांबवावा असे मला वाटतंय, असेही ते म्हणाले. सीजन 12 मध्ये किशोर कुमार यांना ट्रिब्यूट देण्यासाठी शंभर गाण्यांचा एपिसोड नुकताच प्रदर्शित केला जाणार आहे.

यामध्ये अमित कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते, शुटिंग संपताच अमित कुमार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या एपिसोडचा अनुभव आपल्या शैलीत मांडला आहे. यावेळी ते म्हणाले, मला या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी सांगितले होते सर्व स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे करण्यासाठी सांगितले होते.

तसेच ते म्हणाले, मी या शो मध्ये गेलो कारण मी जी किंमत मागितली होती ती त्यांनी देण्याची तयारी दर्शवली, म्हणून मी या शोमध्ये गेलो होतो, असेही ते म्हणाले. तसेच कृपया यापुढे अशा पद्धतीने एपिसोड करू नका असेही अमित कुमार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
Sanjay Dutt : जेव्हा संजय दत्तच्या घरात एके-५६ रायफल सापडली होती तेव्हा काय काय घडले होते? वाचा इनसाईड स्टोरी
Murlidhar jadhav : धैर्यशील मानेंविरोधात शिवसेनेचा ठाण्या वाघ मैदानात, ठाकरेंना मिळाला लोकसभेचा पहीला उमेदवार
bjp : आर आर आबांच्या मुलाला पुन्हा धक्का! यावेळी तर स्वकीयांनीच केला घात

ताज्या बातम्या इतर बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now