Share

काल ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले, ‘तो’ आज जिवंत घर परतला; घटनेची परिसरात चर्चा

मध्य प्रदेशच्या(Madhya Pradesh) ग्वाल्हेर जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाच्या कुटूंबाने एका अनोळखी मृतदेहाला आपल्या मुलाचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्याच दिवशी बेपत्ता झालेला तरुण घरी परतला. या सर्व घटनेमुळे त्या तरुणाच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.(The one who was cremated yesterday returned home alive today; Discussion in the area of the incident)

मिळालेल्या माहितीनुसार, इंदरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील नौगाजा रोडवर राहणारा जुगल किशोर सिंह घरातून बेपत्ता होता. या प्रकरणात जुगलच्या कुटूंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर एके दिवशी ग्वाल्हेरमधील छत्री पार्कमध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती जुगलच्या कुटूंबियांना मिळाली.

त्यानंतर जुगलच्या कुटूंबियांनी तातडीने छत्री पार्कमध्ये धाव घेतली. जुगलला अर्धांगवायू झाला होता आणि ज्या तरुणाचा मृतदेह सापडला त्यालाही अर्धांगवायू झाल्याचे दिसत होते. त्यामुळे कुटूंबियांना हा अनोळखी मृतदेह जुगलचा असल्याचे वाटले. शवविच्छेदन गृहात ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

त्यानंतर कुटूंबियांनी त्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार केले. दुसऱ्याच दिवशी जुगलचे कुटुंबीय इतर विधींसाठी स्मशानभूमीत जाणार होते. त्यावेळी ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले तो त्यांचा मुलगा नसून त्यांचा मुलगा गिरवई परिसरातील एका दुकानात बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुटूंबियांनी यासंदर्भातील सर्व प्रकारची माहिती पोलिसांना दिली.

यासंदर्भातील माहिती मिळताच पोलीस गिरवई परिसरात पोहोचले. त्यावेळी जुगल एका दुकानाबाहेर बसलेला पोलिसांना आढळला. त्यानंतर पोलिसांनी जुगलला त्याच्या कुटूंबियांकडे सुपूर्द केले. पोलीस सध्या ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच्या कुटूंबियांचा शोध घेत आहेत. या घटनेची सध्या परिसरात चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली होती. राजस्थानमधील गावातून एक तरुण बेपत्ता झाला होता. त्या तरुणांच्या कुटूंबियांनी एका अनोळखी मृतदेहाला आपल्या मुलाचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले. त्यानंतर काही दिवसांनी तो तरुण घरी परतला. तरुणाला पाहताच गावकऱ्यांना मोठा धक्का बसला.

महत्वाच्या बातम्या :-
‘बॉम्ब’ने अख्ख जालना शहरच उडवून देणार; इसिसच्या धमकीने राज्यात खळबळ
लग्नाच्या वरातीत डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू; पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून डॉक्टर हदारले
अंगावर वीज पडली म्हणून तरुणाला शेणाने गुंडाळले, एका तासानंतर नंतर जे घडले ते पाहून सगळेच हादरले

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now