मुंब्य्रामधील एका घरामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांना तब्बल ३० कोटींची रोकड आढळून आली. पण या ६ कोटी रूपयांवर पोलिसांनीच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात ठाणे(Thane) पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.(the-oil-gone-you-are-gone-too-seeing-6-crores-the-fate-of-the-police-changed)
पोलिस आपली समस्या सोडवतील हा विश्वास आपल्याला असतो. पण पोलिसच चोर निघाले तर दाद तरी कोणाकडे मागणार? अशीच काहीशी घटना ठाण्यातील मुंब्य्रात उघडकीस आली आहे. याबाबत चाैकशी देखील करण्यात येत आहे. अशी माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी दिली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि ठाणे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांना तक्रार पाठवण्यात आली आहे. या पाठवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फैजल मेमन या व्यावसायीकाकडून ३० कोटी रूपये वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आपला कष्टाचा पैसा असल्याचा दावा करत फैजल मेमन यांनी पैसे परत करण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे.
१२ एप्रिलच्या मध्यरात्री मुंब्रा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तींना सोबत घेऊन मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीतील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला. यावेळी घरात ३० कोटी रुपये होते. पोलिसांनी व्यावसायिकाला २४ कोटी रूपये परत केले, तर ६ कोटी रूपये स्वत:कडे ठेवले. याप्रकरणी व्यावसायिकाने तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी त्या व्यक्तीला ३० कोटींपैकी २४ कोटी रुपये परत केले. सहा कोटी रुपये काढून घेण्यात आले. एवढे पैसे कसे काय घेतले, अशी विचारणा त्या व्यक्तीने केली. त्यावर पोलिसाने त्या व्यक्तीला हाकलून दिले, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ अधिकारी आणि ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच सर्व निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे. पोलिसांकडून तक्रार अर्जाची शहनिशा केली जात आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.
महत्वांच्या बातम्या:-
भारतातील कोरोना मृत्यूसंख्या जास्त दाखवण्यामागे फार्मा कंपन्यांचे षडयंत्र?; मोदी सरकारच्या गंभीर आरोपांनी खळब
ताजमहालातील २२ खोल्या उघडण्यासाठी याचिका करणारांना न्यायालयाने झाप झाप झापले; म्हणाले…
IPL मध्ये मिळाले २.८० कोटी, तरी अंगावर घालायला कपडे नाही; खेळाडूने स्वत:च सांगितली आपबिती






