पंढरपुर मंगळवेढ्यात कोरोनाचा भयानक विस्फोट! निवडणूकीनंतर गावेच्या गावे बेतली

पंढरपुर | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढत्या  रुग्णसंख्येमुळे रूग्णांना सुविधा मिळत नाहीत. लस, बेड, ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुर मंगळवेढ्यामध्ये पोटनिवडणूका लागल्या होत्या. महाविकास आघाडी, भाजप आणि इतर पक्षाने आपआपल्या उमेदवाराला उभं केलं होतं.

आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी होण्यासाठी पक्षातील नेत्यांनी पंढरपुर मंगळवेढ्यामध्ये ढाण मांडले होते. पोटनिवडणूक प्रचाराचा धूरळा चांगलाच उडाला होता. नेत्यांनी गावागावांमध्ये मोठ्या सभा घेत आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं होतं.

मात्र पोटनिवडणूक झाली आणि त्यानंतर पंढरपुर मंगळवेढ्यामध्ये कोरोना रुग्णसंख्यात झपाट्याने वाढ झाली. पंढरपुर तालूक्यात आतापर्यंत ११ हजार ३०० लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. तर २६४ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. पंढरपुर आणि मंगळवेढा तालूक्यात गावागावांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरीकांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे.

इतकचं काय तर प्रचारांमध्ये महत्वाची भूमिका बजावलेले भाजपचे बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, संजय मामा शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आमदार प्रशांत परिचारकांनी केली कोरोनाच्या लसींची मागणी

पंढरपुर मंगळवेढ्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. दोन्ही तालूक्यात १ हजार ८७२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामूळे सोलापुर जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण लसींपैकी ५० टक्के लसी पंढरपुर मंगळवेढा तालूक्यासाठी द्याव्यात. अशी मागणी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

दरम्यान ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ इथवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात २,१०४ कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या देशात अॅक्टिव्ह रूग्ण संख्या २२ लाख ९१ हजार ४२८ आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळं आमच्या आयुष्याची वाट लागलीय आणि इथं लोकं आयपीएल खेळतायत; अभिनेत्री भडकली
लोकांना घरी राहायला सांगता मग तुम्ही का निवडणूका घेता; भाजपच्या नेत्याने मोदींना सुनावले
मास्कविना पकडल्यामुळे पोलिसाने कानाखाली मारली, तर तरुणानेही मारले पोलिसाला; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
कोरोनाच्या संकटात देशाच्या मदतीसाठी भारतीय हवाई दलाचे उड्डाण; औषधे, वैद्यकीय कर्मचारी एअरलिफ्ट 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.