गांधी परिवारातील नाही तर महाराष्ट्रातील नेता होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष? ‘ही’ नावे आहेत चर्चेत

दिल्ली । कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत कलह सुरू आहे. पक्षातील अनेक नेते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. आता काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा ही मागणी जोर धरत आहे.

असे असतानाच सोनिया गांधी या हंगामी अध्यक्षपद सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस कार्यसमितीने नवा अध्यक्ष निवडावा असे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे.

राहुल आणि प्रियंका गांधी यांनी या आधीच अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा होत आहे.

असे असले तरी काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री आणि नेते हे राहुल गांधी यांना आग्रह करण्याची शक्यता आहे. मात्र राहुल सध्या अध्यक्षपद स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाहीत.

गांधी घराण्यातील नव्हे तर इतर नावांवर विचार करावा असेही राहुल गांधी यांनी सुचवले होते. त्यामुळे आता इतर नेत्यांच्या नावांचा विचार करण्यात येत आहे.

यामध्ये आता गुलाब नबी आझाद, ऐ.के अन्टोनी, मोतीलाल व्होरा यांच्या नावाची चर्चा आहे. या नावांमध्ये महाराष्ट्रातले ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचही नाव घेतले जात आहे.

आता कोणाची निवड होणार हे लवकरच समजणार आहे. मात्र बिहार आणि बंगालच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना ही निवड कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.