द नमो स्टोरी: भारतीय राजकारणाचा नवा अध्याय लिहणारे नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी भारताचे विद्यमान पंतप्रधान, ज्यांनी संपूर्ण जगामध्ये भारताला शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण देशांच्या यादी मध्ये समाविष्ट केले. नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस. नरेंद्र मोदी भारतीय राजकारणातील तो चेहरा आहे ज्यांनी कमी कालावधीत देशातील राजकारणाची परिभाषाच बदलून टाकली. चला तर मग जाणुन घेऊयात द नमो स्टोरी.

ग्लोबल लीडर म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करणारे, आणि धडाकेबाज निर्णय घेणारे नरेंद्र मोदी. आज जनता मोदींकडे एका नायकाच्या रूपाने पहाते आहे केवळ मोदीच असे राजकीय नेता आहेत ज्यांना विदेशात देखील मोठ्या प्रमाणात सन्मान दिला जातो.

गुजरातमधील लहान शहरात १७सप्टेंबर १९५० रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब समाजातील शोषित आणि वंचित असणाऱ्या ‘इतर मागासवर्गीय’ गटातील होते. गरीब परंतु प्रेमळ कुटुंबात त्यांचे बालपण गेले. तरुण वयात देशासाठी आणि जनतेच्या सेवेत स्वत:ला वाहून घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

सुरुवातीच्या काळात, त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या राष्ट्रवादी संघटनेबरोबर काम केले. त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टी संघटनेबरोबर काम करताना त्यांनी स्वत:ला राजकारणात झोकून दिले.

गुजरात विद्यापीठातून मोदी यांनी राज्यशास्त्रात एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. २००१ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी चार कार्यकाळ पूर्ण केले. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले.

उत्तम कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी बदल घडविले. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना सुरु केली. व्यापार सुलभ बनवण्यावर भर देण्याबरोबरच त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आवाहनामुळे बदल घडले.

भारत सरकारने येथील जनतेसाठी तीन सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना निवृत्तीवेतन आणि गरीबांना विम्याचे कवच देण्यावर भर दिला. जुलै २०१५ रोजी पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ अभियान सुरु केले. २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले.

नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी १७ नंतर नेपाळचा, २८ वर्षांनंतर ऑट्रेलियाचा, ३१ वर्षांनंतर फिजीचा आणि ३४ वर्षांनंतर सेशेल्सचा द्विपक्षीय दौरा केला.

ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी आखाती देशांचा दौरा केला. आखाती देशात ३४ वर्षांत दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. आखाती देशांशी आर्थिक संबंध बळकट करण्यावर त्यांनी या दौऱ्यात भर दिला.

आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रतिसाद मिळाला. प्रथमच जगभरातील १७७ देशांनी एकत्र येऊन २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून केला.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात देशासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी, करप्रणालीतील बदल, रस्ते वाहतुकीसाठी केलेले बदल, सर्जिकल स्ट्राईक, ऑनलाईन नेटबँकिंग सुविधा, विविध योजना थेट घरापर्यंत पोहोचवणे आणि त्याचे पैसे सबसिडी थेट जनतेच्या खात्यावर टाकणे.

बुलेट ट्रेन, तिहेरी तलाक, कलम ३७० हटवण्याचा निर्णय, गंगा शुद्धीकरणाचा निर्णय, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक, भूसंपादन कायदा, रोजगार हमी योजनेच्या कायद्यात बदल करणे, अटल बिहारी पेन्शन योजना, सुकन्या योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा लोन सारख्या महिलांसाठी सुविधा पंतप्रधान मोदींनी आणल्या.

नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.