गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटलांसह ‘या’ बड्या नेत्यांचं नाव आघाडीवर

मुंबई। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी दुपारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

तर आता गुजरातचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुजरातच्या पुढील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नितीन पटेल, चंद्रकांत रघुनाथ पाटील, मनसुख मांडवीय आणि गोवर्धन जफादीया यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन विजय रुपाणी यांनी आपला राजीना सोपवला आहे.

रुपाणी यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. माध्यमांशी बोलतांना त्यांनी पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आभार मानले आहेत. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. नितीन पटेल हे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत.

आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री पदाची खुर्चीवर कोण बसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गुजरात विधानसभेची निवडणुका अगदी या अगदी १ वर्षाच्या तोंडारवर आल्या आहेत मात्र रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान जर चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री पद दिलं तर गुजरातच्या मुख्यमंत्री पहिला मराठी माणूस मुख्यमंत्री म्हणून जाईल.

त्यामुळं महाराष्ट्रातून देखील चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती मिळत आहे. त्यामुळे आता गुजरातचं मुख्यमंत्रीपद कोणाच्या नावावर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान आज शनिवारी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी तडकाफडकी राजीनामा देत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षात वेळोवेळी नेतृत्वबदल होतच असतात, असं त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटलंय. पक्षात ही स्वाभाविक प्रक्रिया असल्याचा दावाही त्यांनी केलाय. मला पाच वर्षांसाठी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

यापुढे मला जी जबाबदारी दिली जाईल, ती मी मनापासून निभावण्याचा प्रयत्न करीन. आम्हाला पद नकोय तर जबाबदारी हवीय. मला आतापर्यंत जी जबाबदारी मिळाली ती मी पूर्ण केली. असे विजय रुपाणी हे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
संजीव कपूर यांना सुरूवातील शेफ बनायचे नव्हते, त्यांच्या या एका चुकीमुळे ते आज घराघरात झाले फेमस
गणपतीसाठी’मोदक’ बनवण्याची आगळीवेगळी पद्धत; अशाप्रकारे बनवा लाजवाब मोदक.. 
भयावह! वनप्लसच्या फोनचा खिशातच झाला बॉम्बसारखा स्फोट; ग्राहकाच्या उडाल्या चिंधड्या
दान करताना फोटो काढणाऱ्या सेलिब्रिटींवर रोहित शेट्टी भडकला; म्हणाला फोटोग्राफर्सना फोन करून बोलावल्याशिवाय…..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.