आईचा मृतदेह दहा वर्षे ठेवला फ्रिजरमध्ये लपवून; कारण वाचुन संताप येईल

आईच्या मृत्यूनंतर घर सोडावे लागणार या भीतीपोटी एका महिलेने जन्मदात्या आईचा मृतदेह तब्ब्ल दहा वर्षे इमारतीतील फ्रिजरमध्ये लपवून ठेवला. ही संतापजनक घटना जपानमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ६० वर्षीय वृध्द महिलेला सरकारी योजनेतून भाड्याने राहण्यासाठी घर मिळाले होते. ती तिच्या मुलीसोबत  राहत होती. काही दिवसांनी वृध्द आईचा मृत्यू झाला. आईला मिळालेले घर खाली करून जावे लागेल अशी भिती तिच्या मनात होती. त्यामुळे तिने आईचा मृतदेह दहा वर्षे फ्रिजरमध्ये लपवून ठेवला.

युमी योशिनोला असं त्या ४८ वर्षीय निर्दयी मुलीचं नाव आहे. कित्येक महिन्यांपासून युमीने घरभाडे न दिल्यामुळे जानेवारी महिन्यात तिला घर सोडण्याची नोटिस बजावण्यात आली. एका व्यक्तिने घराची तपासणी केली असता त्याला फ्रिजरमध्ये मृतदेह असल्याचं दिसून आलं. त्यानंतर या संपुर्ण घटनेला वाचा फुटली.

युमीने आपल्या आईचा मृत्यु झाल्यानंतर घर खाली करून जावे लागेल या भीतीपोटी हे कृत्य केले आहे. का यामागे काही वेगळे कारण आहे याचाही तपास पोलिस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नाश्त्याला चहा चपाती खाण्याची चूक करताय तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
हेच ऐकायचं बाकी होतं! ‘छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच’; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा
झोपेत असलेल्या नवऱ्याला घातले मुलींचे कपडे आणि केला ‘हा’ विचित्र प्रकार, फोटो व्हायरल  
वडीलांनी दिलेला ‘तो’ सल्ला मी आजही लक्षात ठेवलाय; खिलाडी अक्षयकुमारने दिली कबुली

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.