Lalbaugcha Raja : मुंबई येथील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी अनेक भाविक भक्त येत असतात. कित्येक तास रांगेत उभे राहून भक्तमंडळी याठिकाणी दर्शन घेत असतात. लालबागच्या राजाच्या समोर ठेवण्यात आलेल्या नवसपेटीत पत्र टाकून अनेकजण आपले सुखदुःख राजाला सांगत असतात.
अशाच प्रकारचे एक भावनिक पत्र नुकतेच समोर आले आहे. २०१९ मध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या एका मुलीने आत्महत्या केली. त्या मुलीच्या आईवडिलांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी आपल्या मुलीची शेवटची ईच्छा व्यक्त केली आहे.
मृत मुलीच्या आईचे पत्र
“२०१९ साली लागबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि मुलगी ८ तास उभे होतो. रांग जराही पुढे न सरकल्याने तिचे पाय खूप दुखून रांगेत उभे राहणे अशक्य झाले. तेव्हा ती जवळ उभ्या असणाऱ्या सिक्युरिटी गार्डशी बोलायला गेली. तिथे त्याने तिच्या मनाला लागेल अशी काहीतरी चुकीची भाषा वापरुन उत्तरे दिली.
ते ऐकून संतापलेल्या माझ्या मुलीने मला रांगेतून बाहेर काढून दर्शनासाठी न थांबताच पहाटेच घरी परत नवी मुंबईला आणले. तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याच दिवशी संध्याकाळी गळफास लावून स्वतःला संपवले.
वरील कोपऱ्यातील चित्र माझ्या आर्किटेक्ट मुलीची शेवटची आठवण ठरले. जे तिने नवसाच्या रांगेत बसता यावे म्हणून काढले. ते तिला राजाच्या पेटीत ठेवायचे होते. कार्यकारी मंडळ नवसाच्या पेटीतील योग्य सूचनेप्रमाणे कृती नक्की करते हा तिचा विश्वास होता. ही तिची ईच्छा शेवटची ठरली. म्हणून आम्ही ते बाप्पाच्या चरणी वाहतो.
ती पूर्ण करण्यासाठी आपण आम्हाला यावर्षी नाहीतर पुढच्या वर्षी बाक/खुर्च्या देऊ द्याल तर तिच्या दिवंगत आत्म्याला शांती मिळेल अशी आमची भाबडी समजूत.
– मुलीचे दुःखी आई वडिल बहिण”
या पत्रात वर कोपऱ्यात एक चित्र सुद्धा काढलेले आहे. तसेच या पत्रावर महिलेने तिचे नाव आणि नंबरदेखील दिलेला आहे. मात्र, आम्हाला असे कोणतेही पत्र अजून तरी मिळालेले नाही, असे स्पष्टीकरण लालबाग मंडळाच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्रावर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
Karishma Kapoor: करिष्मा कपूरला आपल्या मित्रांसोबत झोपवणार होता तिचा पती, किंमतही केली होती निश्चित, वाचा किस्सा
Ranbir Kapoor: फक्त ‘या’ कारणांमुळे रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’समोर फिका पडेल १८०० कोटी कमावणारा ‘बाहुबली’
औरंगाबादमध्ये पोलिसांची आता सायकलवरून पेट्रोलिंग; वाचा नेमकं प्रकरण काय?
Arvind Kejriwal : केजरीवालांचे आव्हान भाजपला नाही पेलवले; भाजपला सपशेल तोंडावर आपटवत आपने ‘करून दाखवले’






