‘या’ देशात तयार होतोय जगातला सर्वात महागडा मास्क; किंमत एकूण आश्चर्यचकित व्हाल

दिल्ली | जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे महामारीचा आणि संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता सर्व देशातील सरकारांनी मास्क अनिवार्य केलं आहे. रोज एकच प्रकारचे मास्क वापरून कंटाळा येऊ नये म्हणून अनेक प्रकारचे मास्क बनवण्यात आले.

अगदी काही खास समारंभासाठी नवीन मास्क बनवण्यात आले. जसे की लग्नसोहळ्यासाठी सोन्या चांदीचे मास्क बनवण्यात आले. कुठे हिऱ्यांचे डिझाईन असलेले मास्क तर कुठे चांदीचे डिझाईन असलेले मास्क.

पण सध्या जगात एका नवीन मास्कची चर्चा जोरात रंगली आहे. इस्राईलमध्ये सर्वात महागडा सोन्याचा मास्क बनवण्यात आला आहे. याची किंमत ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या मास्कची किंमत जवळपास १.५ मिलियन डॉलर म्हणजे ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

सोने आणि हिरेजडित या मास्कमध्ये N-95 फिल्टरही बसवण्यात आले आहे. इस्राईलमधील दागिने तयार करणाऱ्या कंपनीने असा दावा केला आहे की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी बनवण्यात आलेला हा सगळ्यात महागडा मास्क आहे. ज्याची किंमत १.५ मिलियन डॉलर्स आहे.

यामध्ये हिरेही लावण्यात आले आहेत. डिझाइनर इसाक लेव्ही म्हणाले की, १८ कॅरेट सोने वापरून बनवलेल्या या मास्कमध्ये ३,६०० ब्लॅक आणि व्हाइट हिरे व N-95 फिल्टर लावण्यात आला आहे. हे खरेदीदाराच्या मागणीवर आधारित आहे.

खरेदीदाराची मागणी आहे की, हा मास्क या वर्षाच्या शेवटी तयार व्हायला हवा. आणि हा मास्क जगातील सर्वात महागडा मास्क असायला हवा. ग्राहकाची ओळख सांगण्यास कंपनीने नकार दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.