“अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ देश विकायला काढला आहे”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी २०२१-२२ साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर करण्याआधी केंद्र सरकारने कोरोना काळात केलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. कोरोनामुळे देशाची विस्कटलेली घडी पाहता अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अर्थमंत्र्यांनी कृषी, व्यापार, शिक्षण, रेल्वे, वाहतुक, बँका यांसारख्या क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता विरोधी पक्षांकडून टिका करण्यात येत आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अर्थसंकल्पावर सडकून टिका केली आहे.

 

 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ देश विकायला काढलायं.” अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काहीच दिलं नाही. अर्थसंकल्प कोणासाठी सादर झाला आहे हे मला समजलं नाही. LIC बाबत झालेल्या निर्णयाचे गरिबांचा इथे गुंतवलेला पैसा जाणार नाही याची हमी सरकार घेणार आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

आगामी तमिळनाडू, पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकण्यासाठी त्या राज्यांना मोठ्या प्रमाणावर पैसा दिला आहे. जीएसटीचा पैसा देऊ असं मोदींनी सांगितलं ते कधी देणार सांगा. असंही जितंद्र आव्हाड म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-

पुन्हा महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलवर अधिभार लावण्याचा निर्णय
महिलावर्गासाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय
झोप लागत नसेल तर आर्मीची ‘ही’ ट्रीक वापरा, २ मिनिटांत झोप येईल
खुशखबर! वाहनाच्या नव्या पॉलिसीमुळे वाहननिर्मितीला मिळणार चालना

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.